
आयएएस संवर्गात नामनिर्देशावरून महसूल संवर्ग आणि अन्य संवर्गातील नामनिर्देशनाच्या निश्चितीवरून संघर्ष पुन्हा सुरू झाला आहे. राज्य सरकारने अजून राज्य संवर्गात नेमके कोणते विभाग येतात, याबाबत केंद्र सरकार सोबत चर्चा करून जाहीर केलेले नाही. त्यामुळे केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणासमोर नवा पेंच निर्माण झाला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महसूल संवर्ग विरुद्ध अन्य अधिकारी मंत्रालय केडर असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. आता राज्य सरकारकडून प्रोमोडेट आयएएस वर्ग अधिकारी नियु्क्ती देताना काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. आजवर नामनिर्देशाने महसूल विभागातील अधिकाऱ्यांना 85 टक्के तर अन्य उर्वरित संवर्गातील अधिकाऱ्यांना 15 टक्के जागा IAS संवर्गात पदोन्नतीसाठी दिल्या जात होत्या.
मात्र राज्य सरकारने राज्यात कोणते विभाग राज्य संवर्गात येतात. हे जाहीर केले नसल्याचे cat ने फटकारले आहे.
महसूल अधिकाऱ्यांना आयएएस वर्गात यामुळे लवकर प्रमोशन मिळेल. या पार्श्वभूमीवर मंत्रालय तसेच अन्य अधिकारी संवर्ग अधिक आक्रमक झाले आहेत. ते राज्य सरकारला याबाबत जाब विचारण्याच्या तयारीत आहे. नुकतेच महसूल संवर्गातील 24 अधिकाऱ्यांना IAS संवर्गात पदोन्नती मिळण्यासाठी UPSC कडे प्रस्ताव गेल्याने हा प्रस्ताव ही अडकण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world