जाहिरात

Operation Tiger News: उद्धव ठाकरे गटाचे 8 खासदार फुटणार? 'ऑपरेशन टायगर'वर नरेश म्हस्केंचा मोठा खुलासा

Operation Tiger News: शिवसेना (UBT) खासदार अरविंद सावंत यांच्या पक्षांतराच्या चर्चांवर शिवसेना नरेश म्हस्के यांनीही मोठे विधान केले आहे. म्हस्केंनी ठाकरेंच्या शिवसेनेची तुलना 'डेडबॉडी'शी करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला, वाचा सविस्तर बातमी...

Operation Tiger News: उद्धव ठाकरे गटाचे 8 खासदार फुटणार? 'ऑपरेशन टायगर'वर नरेश म्हस्केंचा मोठा खुलासा
"Operation Tiger News: ऑपरेशन टायगरबाबत शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांचे मोठे विधान"
DCM Eknath Shinde, Naresh Mhaske, Arvind Sawant X

Operation Tiger News: शिवसेना (UBT) पक्षाचे आठ खासदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. पण या सर्व चर्चा निव्वळ अफवा असल्याचे सांगत खासदार अरविंद सावंत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी या प्रकरणावरून ठाकरे गटासह खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

'युबीटी'ची अवस्था प्रयोगशाळेतील 'डेडबॉडी'सारखी: नरेश म्हस्के

'ऑपरेशन टायगर'च्या चर्चा फेटाळून लावताना ते म्हणाले की,"अरविंद सावंत यांना बदनाम करण्यासाठी युबीटीचे नेतेच अशा बातम्या पसरवत आहेत. म्हस्के पुढे म्हणाले, "संजय राऊत यांच्या कटकारस्थानांमुळे त्यांच्या पक्षाची अवस्था आज मृतावस्थेत आली आहे. प्रयोगशाळेत ज्याप्रमाणे एखादी डेडबॉडी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दिली जाते, तशीच अवस्था या पक्षाची झाली आहे. ही डेडबॉडी कधी शरद पवारांना तर कधी काँग्रेसला अभ्यासासाठी वापरण्यास दिली जात आहे".

तसेच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यातील कोल्ड वॉरमुळेच अशा बातम्या बाहेर येत असल्याचा दावाही त्यांनी केला. सद्यपरिस्थितीत अशा कोणत्याही घडामोडी सुरू नाहीत, असे म्हणत खासदार नरेश म्हस्के यांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. 

(नक्की वाचा: Arvind Sawant: एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश करणार? ऑपरेशन टायगरवर अरविंद सावंतांची पहिली मोठी प्रतिक्रिया)

आईच्या दुधाशी प्रतारणा करणार नाही: अरविंद सावंत 

आपल्या पक्षांतराच्या बातम्या ऐकून धक्का बसल्याचे सांगत अरविंद सावंत यांनी या वृत्ताचा तीव्र निषेध केला. ते म्हणाले, "माझे नाव या बातमीत पाहून मला आश्चर्य वाटले. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मला उभं चिरलं तरी मी मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही. आईने जन्म दिला आणि बाळासाहेबांनी मला घडवले, त्यामुळे पक्षाशी बेईमानी करणे हे आईच्या दुधाशी प्रतारणा करण्यासारखे आहे."

सावंत यांनी विरोधकांना आव्हान देत म्हटले की, "ज्या बैठकीचा उल्लेख केला जात आहे, त्या बैठकीचा फोटो छापण्याची हिंमत दाखवावी. माझ्या फोनचे रेकॉर्ड तपासा, मी कोणत्याही ऑनलाइन किंवा ऑफलाइन बैठकीला उपस्थित नव्हतो. मरेपर्यंत भगवा सोडून कुठेही जाणार नाही."

न्यायालयीन लढाईच्या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक अफवा?

येत्या 24 एप्रिल रोजी न्यायालयात पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. या सुनावणीपूर्वी "ठाकरे गटात काहीही क्षिल्लक नाही" हे दाखवण्यासाठी जाणीवपूर्वक अशा खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप अरविंद सावंत यांनी केला आहे. सध्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्याचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.

Maharashtra Politics | Arvind Sawant एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाणार? Arvid Sawant यांनी केलं स्पष्ट

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com