उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या थेट वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचा पुन्हा एकदा अनुभव बारामतीतल्या एका कार्यक्रमात आला. यावेळी बोलतांना त्यांनी रोड रोमियोंना सज्जड दम दिला. कोणी कुठे तरी लाईन मारायला जाल. तुझी लाईनच काढतो अन टायर खाली घेतो अशा शब्दात त्यांनी दम दिला. कुणालाही अजिबात सोडणार नाही असं ही त्यांनी सांगितलं. त्यामुळे वेळीच शहाणे व्हा, कायदा हातात घेऊ नका. बाबासाहेबांनी संविधान आणि कायदा समाजाच्या भल्यासाठी दिला आहे असं ही ते यावेळी म्हणाले.
नक्की वाचा - EVM मधला निकाल बदलला, जिंकलेला हरला आणि हरलेला जिंकला
आपल्या इथे कामधंदाच्या निमित्ताने युपी बिहारचे लोक येतात. आठ वर्षाच्या मुलीवर ती पण युपीचीच, तिच्यावर एकाने बलात्कार केला. शेवटी बारामतीची बदनामी होणार. असल्याना सोडू नका, मी तर म्हटलं होतं असल्यांचा कायमचाच बंदोबस्त केला पाहीजे. कायदा सुव्यवस्था सुरक्षित राहावी. कोणाची दादागिरी गुंडगिरी असता कामा नये, सर्वांनी शिस्तीचे पालन करावं. तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असला तरी गुंडगिरी खपवून घेवू नका. बारामतीमधील तीन हत्ती चौकात 30 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती करण्यात आली होती. अजित पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की काही ठिकाणी मला कठोर निर्णय घ्यावे लागतात. पिंपरी चिंचवडमध्ये विकास करताना मला अनेकदा अतिक्रमणे काढावी लागली.कोणाच्या पोटावर पाय द्यावा अशी भावना माझी नाही. त्यांची पर्याय व्यवस्था करायचे आहे, त्याबद्दलचे प्रयत्न चालू आहेत असं ही ते म्हणाले. परवा दिवशी एक लाईटचा खांब पडला. त्यात एक बहिण वाचली. उद्या लोकांना वाटणार कसं बोगस काम चालू आहे. अरे त्या हरामखोरांनी नट बोल्टच काढून नेला ना. आता मी त्यांना सांगितले वेल्डिंग करा. हे असले सापडले ना त्यांना मकोका लावा. त्या साल्यांना सोडू नका. असं ही ते यावेळी बोलले.