
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात मोर्चे बांधणी सुरू केली आहे. भारताच्या प्रयत्नांना जगभरातून पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे पाकिस्तान जगात एकाकी पडल्याचे चित्र आहे. जगातील बड्या देशांनी भारताच्या मागे उभे असल्याचं म्हणत आपला पाठिंबा देवू केला आहे. पाकिस्तानला फक्त चीनचा आधार आहे. त्यात आता आणखी एक बडा धक्का पाकिस्तानला बसला आहे. आखाती देशातील श्रीमंत राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कतारने हे भारताला पाठिंबा दिला आहे. या मुस्लिम राष्ट्रानेही भारताच्या मागे उभे राहाण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानसाठी तो एक मोठा धक्का समजला जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल-थानी यांच्यात आज दूरध्वनीवरून महत्त्वपूर्ण चर्चा झाली. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीय नागरिकांचे प्राण गेले त्याबद्दल कतारच्या अमीरांनी भारतातील जनतेप्रती संवेदना व्यक्त केली आहे. शिवाय भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भारताचे हात आणखी मजबूत तर झालेच आहेत. पण पाकिस्तानचा पाय आणखी खोलात गेला आहे. राजकीय दृष्ट्या पाकिस्तान सध्या एकटे पडल्याचे चित्र आहे.
कतारने दिलेल्या पाठिंब्या बद्दल पंतप्रधान मोदी यांनी अमीर शेख तमीम यांचे आभार मानले आहेत. दोन्ही नेत्यांनी भारत-कतार धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावर्षीच्या कतारच्या राजकीय दौऱ्यात घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्धता दोन्ही नेत्यांनी दर्शवली आहे. आखाती देशांवर पाकिस्तान नेहमीच अवलंबून राहिला आहे. मुस्लिम राष्ट्र असल्याचा फायदा आपल्याला होईल अशी अपेक्षा पाकिस्तानची होती. पण त्यांच्या आशेवर आता पुर्ण पणे पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे चोहूबाजून पाकिस्तानची भविष्यात कोंडी होण्याची शक्यता आहे.
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमीका घेतली आहे. पाकिस्तानची प्रत्येक मोर्च्यावर कोंडी केली आहे. आधी पाणी बंद केलं. त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना देश सोडायला लावला. वाघा बॉर्डर बंद केली. व्यापारी संबंध ही तोडले. शिवाय जागतीक पातळीवर पाकिस्तानला एकाकी पाडलं. जगभरातल्या बहुतांश देशांनी भारताला पाठिंबा देवू केला. पाकिस्तानला कायमचा धडा शिकवला पाहीजे अशी मागणी देशभरातून होत आहे. त्या आधी राजकीय स्तरावर पाकिस्तानला भारत मात देत असल्याचं चित्र आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world