महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. शिवाय अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही आहे. असं असताना भाजपला उद्धव ठाकरे यांची कमी अजूनही वाटत आहे. भाजपचे जेष्ट नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ही कमी बोलून दाखवली आहे. उद्धव ठाकरे जर भाजप बरोबर असते तर आता मिळालेल्या विजया पेक्षाही प्रचंड विजय मिळवत सत्ता स्थापन केली असती असं वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. ठाकरे आणि भाजप यांच्यातले संबध टोकाला गेले आहेत. असं असतानाही दानवे यांनी केलेले हे वक्तव्य महत्वाचं समजलं जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरे हे भाजपपासून दुर गेले आहे. हा दुरावा मोठा आहे. असं असलं तरी भाजपच्या काही नेत्यांना उद्धव ठाकरेंबाबत अजूनही आस्था आहे. उद्धव ठाकरे हे भाजप बरोबर असायला हवे होते असं त्यांना वाटतं. अशी वारंवार वक्तव्यही त्यांच्याकडून केली गेली आहेत. त्याता आता भाजपचे जेष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनीही उद्धव ठाकरे हे भाजप बरोबर असायला हवे होते. त्याचा नक्कीच फायदा महायुतीला झाला असता असंही ते म्हणाले आहे.
2019 साली युतीला मोठं बहुमत मिळालं होतं. उद्धव ठाकरे हे आता जरी भाजप बरोबर असते तर आता मिळालेल्या यशा पेक्षा मोठं यश मिळालं असतं. थंम्पिंग मेजॉरटीसहीत सरकार स्थापन केलं असतं असं वक्तव्य दानवे यांनी केलं आहे. पण त्यांच्या वागण्या बोलण्यामुळे त्यांनी स्वत:चं नुकसान करून घेतलं. त्यामुळेच शिवसेना फुटली असंही ते म्हणाले. संजय राऊत यांच्यामुळेच उद्धव ठाकरे हे काँग्रेस बरोबर गेले. शिवाय राऊत हे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात सध्या भांडणं लावत आहेत. हे येत्या सहा महिन्यात समोर येईल असा दावाही त्यांनी केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - भाजपने आधी ठाकरेंना फसवलं आता एकनाथ शिंदेंची फसवणूक, बड्या नेत्याचा बडा आरोप
येत्या पाच तारखेला भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री शपथ घेईल असं दानवे यांनी सांगितलं. त्या आधी विधीमंडळ पक्षाची बैठक होईल. त्यात नेता निवडला जाईल. त्यानंतरच मुख्यमंत्री कोण हे जाहीर केलं जाणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. महायुतीत कोणता ही वाद विवाद नाही. मुख्यमंत्रीपद कोणाला हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता.मात्र आमचा मुख्यमंत्री कोण हे ठरलं आहे. पण वरिष्ठ जो पर्यंत निर्णय घेत नाहीत तोपर्यंत अधिकृत पणे कोणाचेही नाव घोषीत केलं जात नाही असंही ते म्हणाले. हा आमच्या पक्षाचा विषय असल्याचंही ते म्हणाले.
दरम्यान एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत. ही केवळ पेरलेली बातमी आहे असंही ते म्हणाले. ते आराम करण्यासाठी गावी गेले. त्याबाबत शंका उपस्थित करण्याचा प्रश्न नाही. त्यांची तब्बेत ठिक नव्हती त्यामुळे ते आराम करायला गेले होते. महायुतीचं सर्व काही ठरलं आहे. त्यामुळे पाच तारखेपर्यंत अनेक गोष्टी स्पष्ट होतील. शिवाय ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे स्पष्ट आहे. त्यामुळे भाजपच्या जागा या सर्वात जास्त आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल असंही त्यांनी सांगितलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world