राज ठाकरेंच्या प्रत्येक उमेदवाराला किती मतं मिळणार? पवारांनी आकडाच सांगितला

पवारांनी राज यांनी हा निर्णय का घेतला? त्यांच्या प्रत्येक उमेदवाराला किती मते मिळतील? हेच त्यांनी सांगून टाकले.

जाहिरात
Read Time: 3 mins
अमरावती:

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत एकला चलो रे ची भूमिका मांडली आहे. शिवाय विधानसभेच्या दोनशे पेक्षा जास्त जागा लढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. काही मतदार संघात तर उमेदवारांच्या नावाची घोषणाही राज ठाकरे यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे विधानसभेला ते महायुतीत असतील असा अंदाज होता. मात्र हा अंदाज साफ चुकवत राज ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचे निश्चित केले आहे. त्यावर आता  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी टिका करत राज यांना चिमटे काढले आहे. राज यांनी हा निर्णय का घेतला? त्यांच्या प्रत्येक उमेदवाराला किती मते मिळतील? हेच त्यांनी सांगून टाकले. यावरून त्यांनी राज यांना डिवचले आहे. अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आपले मत मांडले. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारही जाहीर केले आहेत. दोनशे पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात ही असणार आहेत. हे सर्व राज ठाकरे भाजपच्या सांगण्यावरून करत आहेत असा थेट आरोप रोहित पवार यांनी केला आहे. ज्या पद्धतीने राज ठाकरे हे वक्तव्य करत आहेत त्यावरून त्यांना भाजपनेच घोड्यावर बसवलेलं दिसतय असंही ते म्हणाले. असं असलं तरी मनसेच्या प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक मतदार संघात दोन हजार मत मिळतील असं म्हणत त्यांनी थेट राज ठाकरे यांनाच डिवचलं आहे. रोहित पवार यांनी केलेल्या या वक्तव्याला आता मनसेकडून कसे प्रत्युत्तर मिळते ते पाहाले लागणार आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह; गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्यांना 25 लाखांचं बक्षीस

दरम्यान यावेळी रोहित पवार यांनी महिलां बंदूका द्या या अमरावतीमधील शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. ज्या आर्थी हा नेता महिलांना बंदूका द्या असं वक्तव्य करतो त्या अर्थी त्यांच्यात सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत हे त्यांनाही वाटत आहेत. महिलांची सुरक्षा करण्यास हे सरकार अपयशी ठरत आहे हे त्यांनीच मान्य केलं आहे. त्यामुळेच त्यांनी ही मागणी केली असावी असेही ते म्हणाले. तर रवी राणा यांच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ते केवळ साड्या आणि रेशन वाटप करतात. तरही लोकसभेत त्यांचा उमेदवार पडला. अशीच स्थिती देवेंद्र भुयार यांची आहे. त्यांच्या मतदार संघात कमिशनगिरी वाढली आहे असा आरोप त्यांनी केला. भुयार हे सध्या अजित पवार गटात आहेत. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - राज्यातील 10 लाख तरुणांना मिळणार रोजगार, वाचा सरकारचा मास्टरप्लान 

अमरावतीत आल्यानंतर त्यांनी बच्चू कडू यांच्याबाबतही वक्तव्य केले आहे. कडू यांनी गेल्या काही महिन्यात शरद पवारां बरोबर भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यामुळे बच्चू कडू महाविकास आघाडीच्या मार्गावर असल्याची चर्चा होती. शिवाय त्यांनी सरकारमध्ये असतानाही सरकारवर टिका केली आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडीत येणार का? अशी विचारणा पवार यांना करण्यात आली. त्यावर  बच्चू कडू यांच्या महाविकास आघाडी येण्या संदर्भात शरद पवार निर्णय घेतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार आपटेंनी तेव्हाच व्यक्त केली होती भीती, पण तरीही दुर्लक्ष?

शरद पवारांची सुरक्षा निवडणुकीच्या तोंडावर का वाढवली जाते यावर ही त्यांनी भाष्य केलं. निवडणुकीच्या तोंडावर जर सुरक्षा वाढवली जात असेल तर ते कोणाला भेटतात? का भेटतात? काय चर्चा केली जाते? याची हेरगिरी करण्यासाठी असू शकते अशी शक्यता त्यांनी यावेळी उपस्थित केली. शिंदे गटाच्या प्रत्येक आमदारांबरोबर दहा-दहा पोलीसांची सुरक्षा आहे. सुरक्षा ही सामान्य लोकांच्या सुरक्षेसाठी वापरली जावी असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.