जाहिरात

Attack on Saif: सैफवरील हल्ला धार्मिक कट्टरतावाद्यांकडून? बड्या नेत्याचा इशारा काय?

सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पुर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो असू शकतो असा संशय व्यक्त केला जातोय.

Attack on Saif: सैफवरील हल्ला धार्मिक कट्टरतावाद्यांकडून? बड्या नेत्याचा इशारा काय?
मुंबई:

सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्यानंतर सर्वच स्तरातन त्याबाबत प्रतिक्रीया उमटल्या आहेत. राजकीय वर्तूळातूनही या हल्ल्यानंतर सरकारवर टीकेची झोड उठली आहे. त्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या हल्ल्याबाबत केलेल्या ट्वीटने या संपुर्ण प्रकरणातच ट्वीस्ट निर्माण झालं आहे. त्यांनी एक मोठं विधान करत या संपुर्ण प्रकरणाला वेगळाच रंग दिला आहे. शिवाय सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पुर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो असंही त्यांनी म्हटलं आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पुर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो असू शकतो असा संशय जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. शिवाय गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव तैमुर ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते. ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे ? या दिशेने ही तपास होणे आवश्यक आहे. असं आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Saif Attacked: हल्ल्यामागे सैफच्याच घरातील व्यक्ती? 8 प्रश्न जे मुंबई पोलिसांना करतायत हैराण

सैफ अली खान यांच्यावर एकूण सहा वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर येत आहे. त्यातील दोन वार हे गंभीर स्वरुपाचे असल्याचे समजते. एक वार त्यांच्या मानेवर करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांच्या मनक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता,वार हा जिवे मारण्याच्या हेतूनेच करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. सैफ अली खान हे भारतामधील चौथ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जाणार्‍या पद्श्री पुरस्काराने सन्मानित आहे. असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Saif Ali Khan Net Worth : सैफला उगाच म्हणत नाहीत छोटे नवाब! संपत्ती समजल्यावर पडाल चाट

हा हल्ला गंभिर असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आव्हाड यांच्या प्रमाणेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही या हल्लाबाबत चिंता व्यक्त केली आहे. सरकारमधील कोणी तरी नागरिकांच्या  सुरक्षेची जबाबदारी घेणार आहे का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. सैफवर झालेला हल्ला हा धक्कादायक आहे. सैफ लवकरच बरा होईल अशी प्रार्थना त्यांनी केली. शिवाय गेल्या तीन वर्षापासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहीली नाही अशी टीका ही त्यांनी केली. तर गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहीजे असं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com