जाहिरात

ABMSS: 'साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी 50 लाख अन् मर्सिडीज कार', राऊतांच्या पत्राने वाद पेटणार?

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार यांनी नाराजी व्यक्त करत एक खरमरीत पत्रच साहित्य मंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना लिहीले आहे.

ABMSS: 'साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी 50 लाख अन् मर्सिडीज कार', राऊतांच्या पत्राने वाद पेटणार?
नवी दिल्ली:

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी एक वक्तव्य केलं. ते वक्तव्य राजकीय होतं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून असं वक्तव्य केल्याने संमेलनाच्या आयोजकांवरही जोरदार टीका झाली. शिवसेना ठाकरे गट त्यासाठी आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार यांनी नाराजी व्यक्त करत एक खरमरीत पत्रच साहित्य मंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना लिहीले आहे.  त्यात त्यांनी आपला आक्षेप नोंदवला आहे. संजय राऊत यांनी लिहीलेले पत्र जसेच्या तसे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

माननीय श्रीमती उषा तांबे,

जय महाराष्ट्र, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 98 वे दिल्लीत साजरे झाले. त्याबद्दल मराठी साहित्य महामंडळाचे अभिनंदन. दिल्लीतील साहित्य संमेलनात चर्चेत आलेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्यबाह्य होते. एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन व त्यातील कार्यक्रमांचे आयोजन झाले. साहित्य महामंडळाच्या परंपरेस हे शोभणारे नाही. या चर्चा-परिसंवादात काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला. 

ट्रेंडिंग बातमी - Ajit Pawar: 'मला हलक्यात घेऊ नका' शिंदें समोरच पवारांची साहित्य संमेलनात शाब्दीक फटकेबाजी

तसेच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले, त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय? दिनांक 23 फेब्रुवारी रोजी 'असे घडलो आम्ही' या परिसंवादात नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली. साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय व सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय? नसेल तर साहित्य महामंडळाने त्वरित माफी मागावी.

ट्रेंडिंग बातमी - Eknath Shinde : 'त्यांचा तिरस्कार मला पुरस्कारा सारखा' एकनाथ शिंदेंनी दिल्लीतून ही सुनावलं

नीलम गोहे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून बाहेर पडताच तालकटोरा मैदानाबाहेर पत्रकारांना सांगितले की, मी महामंडळाच्या सदस्यांना 50 लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले. व उषा तांबे यांना त्याआधी एक मर्सिडीज गाडी भेट देऊन या कार्यक्रमाचे आयोजन करायला लावले." हे खरे की खोटे माहीत नाही, पण महामंडळाच्या प्रतिष्ठेला त्यामुळे धक्का बसला आहे. साहित्य महामंडळ विकले गेले आहे अशी चर्चा लोकांत होणे हे चित्र चिंताजनक आहे. असं संजय राऊत यांनी आपल्या पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.