जाहिरात

Ajit Pawar: 'मला हलक्यात घेऊ नका' शिंदें समोरच पवारांची साहित्य संमेलनात शाब्दीक फटकेबाजी

मोदींनी साहित्य संमेलनाच्या उद्घाटना वेळी छावाची हवा भारतभर आहे असं सांगितलं. त्यानंतर माझं आणि देवेंद्रजींचे ठरलं आहे, असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar: 'मला हलक्यात घेऊ नका' शिंदें समोरच पवारांची साहित्य संमेलनात शाब्दीक फटकेबाजी
नवी दिल्ली:

महायुतीचं सरकार आल्यापासून आम्ही चोविस तास कॅमेऱ्याच्या नजरेत आहोत. कुठे ही गेलं तर कॅमरे ही असतात. कुठे ही सोडत नाही. त्यामुळे काय करावं हे ही समजत नाही, सध्याच्या मीडियाच्या स्थितीबाबत बोलत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपा वेळी ते बोलत होते. त्या वेळी त्यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या एकनाथ शिंदे यांनाही चिमटे काढण्याची संधी सोडली नाही. शिंदेंनी ही मग त्याल दिलखूलास पणे उत्तर दिलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. आपल्यावर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि मी एकाच व्यासपीठवर अनेक वेळा असतो. अशा वेळी आमच्या देहबोलीचा अभ्यास सुरू असतो. त्यामुळे कार्यक्रम संपेपर्यंत आपला चेहरा प्रसन्न दिसला पाहीजे. तो प्रयत्न आम्ही करतो. उगाच कोणती बातमी नको. नाही तर नाराज असल्याच्या बातम्या उगाचच केल्या जाता. पण आमच्यात कोणतीही नाराजी नाही, असं आधीच अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. 

ट्रेंडिंग बातमी - Shivsena News: 'उद्धव यांनी आता खऱ्या शिवसेनेत यावे' ठाकरेंना ऑफर कुणी दिली?

पण आम्ही काही विधानं केली तर त्यांच्यावर वेगवेगळ्या बातम्या केल्या जातात. त्याचे वेगळे अर्थ ही काढले जातात, असं अजित पवार यावेळी म्हणाले. आता परवाच एकनाथ शिंदेंनी असचं एक वक्तव्य केलं. ते म्हणाले मला हलक्यात घेऊ नका. आते ते नक्की कुणाला म्हणाले? मशाल वाल्यांना म्हणाले की..., त्या पुढे बोलण अजित पवारांनी टाळलं. पण त्यांनी ते कुणाला म्हणाले असतील याचा इशार मात्र त्यांनी केला. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला. 

ट्रेंडिंग बातमी - Sena vs Sena: टायरवाल्या काकू, खेळण्यातली मर्सिडीज! ठाकरेंच्या रणरागिणींचा निलम गोऱ्हेंच्या घराबाहेर जोरदार राडा

याला एकनाथ शिंदे यांनी ही त्यांच्या भाषणात उत्तर दिलं. मला हलक्यात घेऊ नका हे अडीच वर्षा पुर्वीसाठी होतं असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान संमेलनात वाद, नाराजी नाट्य झालेलं नाही. हे चांगल्या वातावरणात संमेलन पार पडलं असं अजित पवार म्हणाले. हा मराठी माणूस महाराष्ट्रा बाहेर पडला की समजूतदारपण दाखवतो असं ही ते यावेळी म्हणाले. दिल्लीत जो महाराष्ट्रातला मराठी माणूस आहे. त्यांना दिल्लीत भेटण्यासाठी, चर्चा करण्यासाठी एखादी जागा उपल्बध होईल का ते पाहावे. त्याला कितीही कोटी लागले तरी निधी कमी पडू देणार नाही. महाराष्ट्राला साजेशी वास्तू आपण दिल्लीत उभी करूअसं आश्वासन यावेळी अजित पवारांनी दिलं. 

ट्रेंडिंग बातमी - Shivsena News: मर्सिडीज वरून राजकारण सुसाट! गोऱ्हेंकडे आता थेट पावत्यांची मागणी

मोदींनी साहित्य संमेलनाच्या उद्घाटना वेळी छावाची हवा भारतभर आहे असं सांगितलं. त्यानंतर माझं आणि देवेंद्रजींचे ठरलं आहे. चार किंवा पाच मार्चला विधानभवनाच्या समोर असलेल्या आयनॉक्समध्ये सर्व आमदारांना हा चित्रपट आपण दाखवणार आहोत. शिवाय तुळापूर आणि वडूला छत्रपती संभाजी महाराजांचे दिमाखदार स्मारक आम्ही उभारणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. छावा मुळे नव्या पिढीला छत्रपती संभाजी महाराज समजले असंही अजित पवार यावेळी म्हणाले.