
दिल्लीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपा वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी त्यांना दिल्लीत देण्यात आलेल्या महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराचा आवर्जुन उलेख केला. या निमित्ताने त्यांनी ठाकरेंना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही. मला दिल्लीत पुरस्कार मिळाला. त्याचा अनेकांना त्रास झाला. ज्यांना त्रास झाला, त्यांनी माझा नेहमीच तिरस्कार केला. त्यांचा तिरस्कारही मला पुरस्कारा सारखाच वाटला, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मला हलक्यात घेऊ नका हे एकनाथ शिंदे नक्की कुणाला म्हणाले हे सजलं नाही. असं अजित पवार याच व्यासपीठावरून म्हणाले. त्याला ही शिंदेंनी उत्तर देत ते अडीच वर्षापूर्वीसाठी होतं असं सांगत पुन्हा त्यांनी ठाकरेंकडेच बोट केले.आपण आजही सर्व सामान्यांचे आहोत हे सांगायला शिंदे विसरले नाहीत. मी जिकडे जातो तिकडे सगळे सेल्फीचा आग्रह धरतात. मी सर्व सामान्यांचा मुख्यमंत्री होतो असं सांगायचो. आता स्लेफी दिला नाही तर म्हणतील हा आता हा भाव खातो. त्यामुळे सर्वांना समाजावून घेतो असं ही शिंदे यावेळी म्हणाले.
दिल्लीत एकेकाळी मराठ्यांची छावणी होती. आता मराठी साहित्यांची छावणी दिल्लीत आहे. इथं तलवारीने नाही तर विचाराने आणि लिखाणाने सर्वांची मनं जिंकली जात आहेत. मराठी भाषांचा संगम या निमित्ताने दिल्लीत पाहायला मिळाला आहे. मराठी भाषेच्या संवर्धनाचा वसा आपण घेवून इथून जाणार आहोत. हे संमेलन खऱ्या अर्थाने संस्मर्णीय आहे. अभिजात मराठी भाषेचे हे पहिलं संमेलन असल्याचंही शिंदे यावेळी म्हणाले. अभिजात भाषेचा दर्जा दिल्या बद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन ही यावेळी केले.
ट्रेंडिंग बातमी - Shivsena News: 'उद्धव यांनी आता खऱ्या शिवसेनेत यावे' ठाकरेंना ऑफर कुणी दिली?
आपण मुख्यमंत्री असताना जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा दिला होता. हे गीत प्रत्येक शाळांमध्ये आता राष्ट्रगितानंतर म्हटलं जातं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आपल्याच कार्यकाळात मिळाल्याचे ते म्हणाले. हे गौरवास्पद आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला यासाठी सर्वांनी प्रयत्न केले होते. त्यात माझा ही सहभाग होता, असं शिंदे म्हणाले. साहित्य संमेलनात चर्चा होतात. परिसंवाद होतात. त्यात महत्वाचे मुद्दे मांडले जातात. त्यातून आपली जबाबदारी संपत नाही. असंही शिंदे यावेळी म्हणाले.
त्यातून तुम्ही सरकारला चांगल्या सुचना जरूर करा. संमेलन संपल्यानंतर सरकारपर्यंत त्या पोहोचला. त्यासाठी पाठपुरावा करा. दादांकडे तिजोरीची चावी आहे. त्यामुळे पैशांची काही कमी पडणार नाही. मराठी भाषेला जागतिक पातळीवर नेण्यासाठी कालबद्ध योजना आखली पाहीजे, असं ही ते म्हणाले. भाषा आपली अस्मिता आहे. ते पैसे कमवण्याचे साधन नाही. भाषा संपली तर आपलं अस्तित्व ही संपेल. भाषा टीकावी यासाठी अशा संमेलनाची गरज आहे असं ही यावेळी शिंदेंनी सांगितलं. दरम्यान दिल्लीत जागा मिळाली तर तिथे शिवसृष्टी उभी करु असं ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world