'हवेत जाऊ नका' हरियाणाच्या निकालानंतर मविआची वादळी बैठक, राऊत- पटोले भिडले?

संजय राऊत यांनी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना चांगलेच खडे बोल सुनावले असल्याचे समजते. हवेत जाऊ नका, जमिनीवर या असा संदेशच या बैठकीत राऊत यांनी दिला.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

सागर कुलकर्णी 

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्याचे पडसाद राज्यात महाविकास आघाडीत पाहायला मिळत आहे. निकालानंतर झालेल्या मविआच्या बैठकीत शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना चांगलेच खडे बोल सुनावले असल्याचे समजते. हवेत जाऊ नका, जमिनीवर या असा संदेशच या बैठकीत राऊत यांनी दिला. शिवाय सामनाच्या अग्रलेखातूनही काँग्रेसचे कान टोचले. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही पलटवार करत राऊतांनी अग्रलेख जाणिवपुर्वक लिहीला की वस्तूस्थिती सांगितली हे विचारणार आहे असे सांगितले. त्यामुळे सध्या मविआमध्ये तणावाचे वातावरण मात्र निर्माण झाले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हरियाणात काँग्रेस अंतर्गत वाद, तसेच भाजपने झालेली मुसंडी, या साऱ्या गोष्टींचा परिणाम राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकांवर होणार आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. त्यात हरियाणाचा निकाल काँग्रेससाठी प्रतिकूल लागला. त्यानंतर हीच संधी महाविकास आघाडीतील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने साधली. त्यांनी काँग्रेसला कोंडीत पकडले आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी तर काँग्रेसला थेट आव्हान दिले आहे. हवेत जाऊ नका असे त्यांनी मविआच्या बैठकीच काँग्रेस नेत्यांना सुनावले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज - हरियाणातील पराभवानंतर ठाकरेंच्या काँग्रेसला कानपिचक्या, थेट सुनावलं

ऐवढेच नाही तर माध्यमांबरोबर बोलताना काँग्रेसला जर स्वबळावर निवडणूका लढायच्या असतील तर त्यांनी तसा निर्णय घ्यावा. म्हणजे राज्यातील पक्ष त्यांची भूमिका घेतील असे राऊत म्हणाले. काँग्रेसने हरियाणाच्या पराभवानंतर काही तरी शिकले पाहीजे असा सल्लाही राऊत यांनी दिला. जर इंडिया आघाडी म्हणून निवडणूक लढली गेली असती तर कदाचित निकाल वेगळे लागले असते असेही ते म्हणाले. तर त्याला नाना पटोले यांनी ही तसेच उत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी जो अग्रलेख लिहीला आहे तो जाणिपूर्वक लिहीला आहे की वस्तू स्थिती मांडली आहे हे आम्ही त्यांना बैठकीत विचारू असे सांगितले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - कोकणात भाजपचे नमते? शिंदेंच्या सेनेला झुकते माप,भाजपच्या पदरात किती जागा?

दरम्यान हरियाणाच्या निकालानंतर काँग्रेसचे मित्रपक्ष आता त्यांची डोकेदुखी ठरू शकतात अशी स्थिती आहे. काँग्रेसने जागा वाटपामध्ये विदर्भात तसेच मराठवाडा आणि मुंबईत काही जागांवर दावा केलाय. त्या जागांवरच काही ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून तर  काही ठिकाणी शरद पवार राष्ट्रवादीकडून दावा केला जातोय.अशा वेळी काँग्रेस बॅकफूटवर येण्याची चर्चा रंगली आहे. काँग्रेसला आता काही जागांवर तडजोड करावी लागणार आहे अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - पवारांचा हरियाणात एकमेव उमेदवार, जिंकला नाही पण काँग्रेसचा उमदेवार पाडला

जागा वाटपाची चर्चा सुरू झाल्यानंतर पुन्हा थांबत आहे. आता शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार हे जागा वाटपात आक्रमक झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस जागा वाटपात दोन पावलं मागे घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हरियाणा मधील निकाल प्रतिकूल लागल्याने काँग्रेसची राज्यात राजकीय कोंडी झाली आहे. जर हरियाणामध्ये अधिक चांगले निकाल लागले असते तर राज्यात देखील काँग्रेसला फायदा झाला असता. मात्र सध्या तरी तशी स्थिती नाही हे स्पष्ट होत आहे.