Suresh Dhas on Parli Pattern : बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) हत्या प्रकरणाचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटत आहेत. नागपूरमध्ये झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही या हत्या प्रकरणावर चर्चा झाली होती. अन्न आणि नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) आरोपी आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडेंवरही आरोप करण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुरेश धस यांचा गंभीर आरोप
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील राजकारण, गुंडगिरीवर रोज नवे गौप्यस्फोट होत आहेत. हे गौप्यस्फोट करण्यात भाजपाचे जिल्ह्यातले आमदार सुरेश धस (BJP MLA Suresh Dhas) आघाडीवर आहेत. धस यांनी आज (शुक्रवार, 27 डिसेंबर) पत्रकारांशी बोलताना इव्हेंट मॅनेजमेंटच्या 'परळी पॅटर्न' चा गौप्यस्फोट केला. त्यांनी यावेळी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.
गेल्या काही दिवसांपासून धस सातत्यानं मुंडे यांना लक्ष्य करत आहेत. त्यांनी यावेळी 'परळी पॅटर्न' सांगताना सपना चौधरी, रश्मिका मंदाना आणि प्राजक्ता माळी या अभिनेत्रींचीही नावं घेतली आहेत. त्यामुळे नवी चर्चा सुरु झाली आहे.
( नक्की वाचा : Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या हाती पिस्तूल सोबत वाल्मिक कराड, दमानियांनी दाखवले Video )
काय म्हणाले धस?
बीड जिल्ह्यातल्या गायरान जमिनी 'आका' आणि त्यांचे चेलेचपाटे हडप करत असल्याचा आरोप धस यांनी केला. हा नवा परळी पॅटर्न आता सर्व जण पाहात आहेत असा आरोही त्यांनी केला. या मागे कोण आहे हे पोलिसांनी शोधले पाहीजे असंही ते म्हणाले.
'आकांचे इथं शंभर एकर आहे. दीडशे एकर आहे. आकांनी इथं प्रचंड खर्च केलाय. 30-30 कोटी, 40-40 कोटींचे नुसते बंधारेच बांधलेत आपल्याच जमिनीत. मग हे इतकं कुठून आहे या पाच वर्षात एवढं कुठून आलं आणि आम्ही आपलं त्यांचं बघत असतो... रश्मिका मंदाना, सपना चौधरी, मग असे इव्हेंट बघायचे यांचे, इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कुणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा.
( नक्की वाचा : Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना शेवटच्या क्षणी मंत्रिपद कसं मिळालं? कोणते फॅक्टर ठरले निर्णायक? )
सपना चौधरी, रश्मिका मंदाना, अजून काय प्राजक्ता माळी... हा प्राजक्ता माळीसुद्धा आमच्याकडं येतात बरं का हे सगळं जर का बघायचं असेल तर चित्रपट नवीन कुणाला काढायचा असेल तर आशा मोठ्या ज्या विभूती आहेत, विभूती म्हणतो. अश्या मोठ्या विभूती त्यांच्या तारखा, त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात, काय होतात, प्राजक्ता ताईसुद्धा आमच्या इथं येतात तर याच्यासाठी अतिशय जवळचा पत्ता जर तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे, परळीचा हाही एक पॅटर्न आहे,' अशी टीका धस यांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world