सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घ्यावा अशी मागणी होत आहे. त्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहे. शिवाय धनंजय मुंडे यांच्या पक्षातील काही आमदारांनीही ही मागणी केली आहे. तर भाजप आमदार सुरेश धस यांनी तर हे प्रकरण लावून धरले आहे. मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी जाहीर मागणी त्यांनी केली आहे. तसं करता आलं नाही तर त्यांना बिन खात्याचं मंत्री करा अशी ही त्यांची मागणी आहे. त्यात आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण धनंजय मुंडे यांनी भोवणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संजय शिसराट यांनी आपले मत मांडताना संतोष देशमुख हत्ये प्रकरणी एसआयटीचा तपास सुरु आहे. यात कोणताही मोठा राजकीय नेता असला तरी त्याला सोडलं जाणार नाही. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. या प्रकरणात जे जे अडकले आहे. ज्यांचा यात हात आहे त्यांनी माफी नाही असं शिसराट म्हणाले. जर या प्रकरणाशी अगदी धनंजय मुंडे यांचा जरी संबध असला तरी त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं शिरसाट यांनी स्पष्ट केलं. ते शिर्डीत आले असता त्यांनी ही प्रतिक्रीया दिली.
शिरसाट यांच्या या वक्तव्या मुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर आधीच राजीनामा देण्याचा दबाव आहे. त्यात आता महायुती मधील सहकारीही विरोधात जात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीवरही दबाव वाढला आहे. पडद्या मागे काही घडामोडी घडत असल्याचेही बोलले जात आहे. एकीकडे विरोधक आणि दुसरीकडे स्वकीय यांच्या कात्रीत धनंजय मुंडे सापडले आहेत. अशा वेळी मुंडे स्वत: राजीनामा देणार की त्यांना महायुतीचे नेते द्यायला लावणार याची चर्चा आता राजकीय वर्तूळात सुरू झाली आहे.
संजय शिरसाठ हे शिर्डीत मंडपम अधिवेशनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबतचे वक्तव्य केले. शिवाय त्यांनी संजय राऊत यांना ही लक्ष्य केले. सकाळचा भोंगा असा संजय राऊत यांचा उल्लेख केला. सकाळच्या भोंग्यानं उबाठा गटाची वाट लावली. सध्या त्यांची भाषा मवाळ झाली आहे. सध्या ते ज्यांना शिव्या देत होते त्यांचेच कौतूक करत आहेत असं शिरसाट यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world