जाहिरात

Manoj Jarange:'...तर घराघरात घुसून हाणायचं' जरांगेंची थेट धमकी, वाद पेटणार?

या संपुर्ण प्रकरणात धनंजय मुंडेचा थोडा जरी हात असला तरी त्यांना यापुढे सुट्टी नाही. यात जरा जरी सापडू द्या, त्याला राज्यात फिरू देणार नाही असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला.

Manoj Jarange:'...तर घराघरात घुसून हाणायचं' जरांगेंची थेट धमकी, वाद पेटणार?
परभणी:

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीला जसा वेग येत आहे तसा, त्यांना न्याय मिळावा यासाठी रस्त्यावरचा लढाही तिव्र झाला आहे. परभणीत आज आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चावेळी मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना थेट धमकी देत निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यामुळे वातावरण चांगलच तापलं आहे. शिवाय संतोष देशमुखचं कुटुंब एकटं नाही. त्यांच्या मागे संपुर्ण मराठा समाज आहे असं ही जरांगे पाटील यावेळी म्हणाले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

परभणीच्या आक्रोश मोर्चा वेळी झालेल्या जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे यांनाच लक्ष्य केलं. मला कुणकुण लागल्या शिवाय मी कोणाच्या वाट्याला लागत नाही. पण आता जबाबदारीने बोलत आहे. संतोष देशमुख यांचं कुटुंब एकचं नाही. त्यामुळे या पुढच्या काळात त्यांच्या कुटुंबाला धक्का जरी लागला तरी धनंजय मुंडेला रस्त्यावर फिरू देणार नाही अशा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला. आमचा एक भाऊ तर गेला. ते आम्ही सहन केलं. पण आता या मुंड्या फुंड्याचं नाव ही घेतलं नाही. ही हरामखोरांची औलाद आहे. त्याच्या पैकी एकालाही रस्त्यावर फिरू देणार नाही अशी थेट धमकी दिली आहे.   

ट्रेंडिंग बातमी - Santosh Deshmukh case: 'अजितदादा क्या हुवा तेरा वादा' धसांनी मुंडेंना लक्ष्य करत परभणीचा मोर्चा गाजवला

मनोज जरांगे पाटील ऐवढ्यावर थांबले नाहीत. ते म्हणाले बीड परळीत मराठा समाजातील लोकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. या पुढच्या काळात मात्र जर त्रास झाला तर धाराशीव परभणीत त्यांच्या घरा घरात घुसून हाणायचं. त्यांना एकदा बघायचंच अशी धमकी ही जरांगे यांनी देवून टाकली.  मी असं कधी बोलत नाही. पण ज्यावेळी अस्मितेचा विषय येतो. माणसांचे मुडदे पडायला लागला. त्यावेळी सहन होत नाही. हा आमचा माज नाही. मस्ती नाही. पण लेकरं उघड्यावर पडली तर कसं जगायचं. शांत कसं बसायचं असा प्रश्नही त्यांनी या निमित्ताने केला. 

ट्रेंडिंग बातमी - वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे; बीडचे आरोपी पुण्यातच का सापडतात ?

 यावेळी जरांगे यांनी गंभीर आरोप केले आहेत. तुम्ही लोकांना मारून आरोपींना घरात लपवून ठेवता. या आरोपींना पुण्यात सांभाळलं कुणी? सर्व आरोपी पुण्यात कसे सापडले? असे प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केले. याचा अर्थ तुमच्या सरकारमधील मंत्री आरोपींना सांभाळत आहेत. खंडणी आणि हत्येतील आरोपींची नार्को टेस्ट झाली पाहीजे. शिवाय त्यांना संभाळणाऱ्या सर्वांना  सहआरोपी केलं पाहीजे. अशी मागणी जरांगे यांनी यावेळी केली. आरोपींना फाशी झालीच पाहीजे. तसा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तसं झालं नाही तर मंत्र्यांना गोट्याने हाणल्या शिवाय राहाणार नाही असंही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Beed Daudpur Story: नाव दाऊदपूर अन् दहशत दाऊदपेक्षाही खतरनाक, 'राख' माफियांच्या गावची गोष्ट

या संपुर्ण प्रकरणात धनंजय मुंडेचा थोडा जरी हात असला तरी त्यांना यापुढे सुट्टी नाही. यात जरा जरी सापडू द्या, त्याला राज्यात फिरू देणार नाही असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला. आता तपासात काही विशिष्ठ जातीचे अधिकारी हस्तक्षेप करू लागलेत. पण या प्रकरणातील सर्वांना फासावर लटकवणार हा शब्द दिला आहे. तो त्यांनी पुर्ण केला नाही तर मराठा काय आहे ते त्यांना दाखवून देणार असंही ते म्हणाले. रविवारी पाच तारखेला पुण्यात मोर्चा आहे. त्याला सगळ्यांनी यावं असं आवाहनही जरांगे पाटील यांनी यावेळी केलं. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com