शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार पक्षाच्या कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून यावेळी अनेक नेत्यांच्या पदाबाबत घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नवनिर्वाचित आमदार आणि दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचे सुपूत्र, देशातील सर्वात तरुण आमदार असलेले रोहित पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नक्की वाचा - Shrinkat Shinde : उपमुख्यमंत्रिपदाच्या चर्चेबाबत श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शरद पवारांनी रोहित पाटील यांना लहान वयात मोठी जबाबदारी सोपवल्याचं दिसून येत आहे. मुख्य प्रतोदपदी रोहित पाटील यांची निवड करण्यात आली असून उत्तम जानकार यांची प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. विधीमंडळ पक्षाच्या नेत्यांबाबत आज निर्णय झालेला नाही. पुढील बैठकीत विधीमंडळ पक्षाच्या नेत्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यावेळी 10 पैकी 9 सदस्य उपस्थित होते. संदीप क्षीरसागर यांच्या मतदारसंघात सरकारी कार्यक्रम असल्याने ते अनुपस्थितीत होते. मात्र उद्या येऊन ते या निवडीला पाठिंबा देतील अशी माहिती आहे. जयंत पाटील यांनी १ डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेत नावांची घोषणा केली आहे. आमदारांची संख्या कमी असली तरी आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्याचं काम करीत राहू असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world