Sharad Pawar: कृतीतून संदेश देण्याचा प्रयत्न, शरद पवारांचा नेमका प्लॅन आहे तरी काय?

90 च्या दशकात देशाचे संरक्षण मंत्री असताना त्यांनी अरबी समुद्रात नौदलाच्या 'जॅकस्टे' (Jackstay) सरावात शरद पवारांनी प्रत्यक्ष भाग घेतला होता.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

महाराष्ट्र राजकारणाच्या महासंग्रामात शरद पवार हे अशा मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत, ज्यांना 'व्हिज्युअल नॅरेटिव्ह' म्हणजेच दृश्यांच्या माध्यमातून राजकारण साधण्याची कला उत्तमप्रकारे अवगत आहे. "एक चित्र हजार शब्दांचे काम करते," या उक्तीनुसार पवारांनी गेल्या पाच दशकात अनेकदा गुंतागुंतीच्या प्रसंगी भाषणांऐवजी केवळ आपल्या कृतीतून संदेश देण्याचे काम खुबीने केलं आहे. नुकत्याच झालेल्या एका दुर्दैवी विमान अपघातात शरद पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे निधन झाले. यानंतर, शरद पवारांनी पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत जनमानसात एक विशिष्ट संदेश देण्याचा प्रयत्न केला.  

नक्की वाचा: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पहिला दौरा! पोरक्या झालेल्या लेकरांची भेट घेणार

नीरा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा आणि शरद पवारांची पाहणी

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांदरम्यान शरद पवार प्रकृतीचे कारण देत सक्रिय प्रचारापासून काहीसे दूर राहिले होते. मात्र, बारामतीतून जेव्हा अजित पवारांच्या निधनाची धक्कादायक बातमी आली, त्यानंतर काही तासांतच शरद पवार पुन्हा एकदा जनमानसात सक्रिय दिसले. ज्या दिवशी अजित पवारांच्या अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम होता, त्याच दिवशी शरद  पवारांनी बारामतीतील नीरा नदीच्या काठावर जाऊन तिथल्या स्थानिकांची भेट घेतली. नदीतील वाढत्या प्रदूषणाबद्दल ही भेट असल्याचे सांगण्यात आले. प्रदूषणाच्या मुद्दावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही केली. ही कृती वरकरणी नॉर्मल वाटत असली तरी त्यामागे एक राजकीय अर्थ दडलेला आहे. 

शरद पवारांना नेमके काय सांगायचे आहे ?

पवारांच्या या कृतीचा नेमका अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला असून अजित पवारांच्या पश्चात हा मतदारसंघ आणि इथली जनता पोरकी झालेली नाही, हा विश्वास त्यांनी आपल्या कृतीतून देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, राज्याच्या राजकीय यंत्रणेला त्यांनी हा स्पष्ट संकेत दिला आहे की, मी अजूनही सक्रिय आहे आणि आगामी काळात निर्माण होणाऱ्या कोणत्याही राजकीय स्थितीत सर्व सूत्रे आपल्या हाती घेण्यासाठी सक्षम आहे.

नक्की वाचा: Ajit Pawar Death: 'ज्यांनी हे पाप केलं असेल, भविष्यात त्यांच्या...' अमोल मिटकरींचा शाप 

राजकारणातील 'धुरंधर' आपणच असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न

90 च्या दशकात देशाचे संरक्षण मंत्री असताना त्यांनी अरबी समुद्रात नौदलाच्या 'जॅकस्टे' (Jackstay) सरावात शरद पवारांनी प्रत्यक्ष भाग घेतला होता. दोन युद्धनौकांदरम्यान बांधलेल्या एका दोरीवरून ते एका युद्धनौकेतून दुसऱ्या युद्धनौकेत गेले होते. त्यावेळी त्यांचे फोटो प्रसिद्ध झाले होते, जे दिल्लीतील मंत्रालयाच्या वातानुकूलित कार्यालयाचा मोह सोडून प्रत्यक्ष रणांगणावरील सैनिकांची खडतर परिस्थिती जाणून घेणाऱ्या एका कणखर नेत्याची जनमानसातील प्रतिमा अधोरेखित करणारे फोटोग्राफ असल्याचे वाटत होते.  अजित पवारांच्या निधनानंतर आता पक्षात आणि राज्यात जे मोठे बदल अपेक्षित आहेत, त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची नीरा नदीच्या काठावरची उपस्थिती ही एका नवीन सुरुवातीची नांदी मानली जात आहे. 80 वर्षांहून अधिक वय असूनही आपण मैदानात आहोत आणि कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास समर्थ आहोत, हेच पवारांनी पुन्हा एकदा जदाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.  

Advertisement
Topics mentioned in this article