जाहिरात

मारकडवाडीत आज शरद पवार जाणार, चर्चेचा अजेंडा ही ठरला

मारकडवाडीतल्या गावकऱ्यांनी विधानसभेला झालेल्या मतदानाबाबत शंका उपस्थित केली आहे.

मारकडवाडीत आज शरद पवार जाणार, चर्चेचा अजेंडा ही ठरला
सोलापूर:

मारकडवाडी गावाचं नाव आता सर्वांच्याच तोंडावर आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय याच गावाने घेतला होता. त्यानंतर हे गाव रातोरात देशात चर्चेत आलं. याच गावाला आज शरद पवार भेट देणार आहे. त्यांची ही भेट महत्वाची समजली जाते. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते यावेळी शरद पवारां बरोबर असतील. शिवाय स्थानिक आमदार उत्तम जानकर हे ही उपस्थित असणार आहे. हे गाव उत्तम जानकर यांचा गड मानला जातो. असं असतानाही याच गावातून उत्तम जानकर यांना कमी मतं मिळाली होती. त्यानंतरच गावकऱ्यांनी गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता.    

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बॅलेट पेपर वरील मतदानमुळे मारकडवाडी गाव हे चांगलेच चर्चेत आले आहे. याच मारकडवाडी गावात आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास शरद पवार येत आहेत. मारकडवाडीत जाऊन शरद पवार हे तेथील नागरिकांशी बॅलेट पेपर वरील मतदानासंदर्भात चर्चा करतील. यामध्ये स्थानिक नागरिक हे आजपर्यंतच्या निवडणुका तसेच चालू वर्षातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तुलनात्मक आकडेवारी शरद पवार यांच्या समोर ठेवणार आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - एकनाथ खडसेंचे फडणवीसांबाबत मोठे वक्तव्य, मोठी घडामोड होणार?

यावेळी आमदार उत्तम जानकर हे देखिल आपली भूमिका शरद पवार यांच्या समोर ठेवतील.यानंतर शरद पवार हे आपली भूमिका मारकडवाडी येथून जाहीर करतील. एकंदर विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही मारकडवाडी गाव चांगलेच गाजले. यानंतर आता थेट शरद पवार मारकडवाडी गावात पोहोचत असल्याने मरकडवाडी संदर्भातील चर्चा आता अधिक जोमाने होतील. या भेटीनंतर शरद पवार काय भूमीका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय शरद पवारांनीही निवडणुकीचा लागलेला निकाल हा अनपेक्षित असल्याचं अधिच सांगितलं आहे. शिवाय ईव्हीएमबाबत प्रश्न निर्माण होईल अशी वक्तव्यही त्यांनी केली आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - बॅलेटवर मतदान घेण्याचा मारकडवाडीचा निर्णय का? गावकरी काय म्हणाले?

मारकडवाडीतल्या गावकऱ्यांनी विधानसभेला झालेल्या मतदानाबाबत शंका उपस्थित केली आहे. या गावात भाजपला 1003 मतं तर तुतारी म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 843 मतं मिळाली. हे इथल्या गावकऱ्यांना पटलेलं नाही. या गावात 80 टक्के मतदान हे धनगर समाजाचे आहे. विद्यमान आमदार उत्तम जानकर हे याच समाजाचे आहे.  असं असताना ही उत्तम जानकर या गावात पिछाडीवर होते. त्यामुळे जानकर कसे मागे पडले असा संशय गावकऱ्यांना आला. 

ट्रेंडिंग बातमी - विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेना -राष्ट्रवादीला नाहीच? भाजपचा उमेदवारही ठरला?

त्यांनी तातडीने गावातल्या सर्व लोकांची बैठक बोलवली. त्यात सुशिक्षित, तरूण, महिला यांचा समावेश होता. निकालानंतर आमची मतं कुठे गेली असं प्रत्येक जण विचारत होता. त्याच वेळी आम्हाला ईव्हीएम बाबत शंका आल्याचे गावकरी सांगतात. त्यानंतरच सर्वांनी मिळून बॅलेटवर निवडणूक घेण्याचा निर्णय केला होता. त्याची तयारीही  करण्यात आली. मतदान ही होणार होतं. पण पुढे प्रशासनाने या निर्णयाला बंदी घातली. तसं केल्यास तुमच्यावर कारवाई करू असा इशारा देण्यात आला. त्यानंतर मात्र ही बॅलेट पेपरवरिल मतदान प्रक्रीया स्थगित करण्यात आली.  
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com