शिवसेनेमधील दुफळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही दोन भाग झाले. या फुटीनंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. पक्ष फुटीनंतर अजूनपर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेत्यांची ये-जा सुरूच आहे. अजित पवार राष्ट्रवादी पक्ष फोडून महायुतीसोबत गेले त्यावेळी यामागे शरद पवार यांचा हात असल्याची चर्चा केली जात होती. दरम्यान लवकरच दोन्ही पवार एकत्र येतील असाही तज्ज्ञांचा अंदाज होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान या मुद्द्यावरुन राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. कारण आहे शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याचं. शरद पवार यांनी एका वृत्त माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार गट आणि अजित पवारांचा गट एकत्र येण्याबाबत शरद पवारांच्या वक्तव्यावेन पुन्हा एका महाराष्ट्राच्या राजकारणात विलिनीकरणाचे वारे वाहताना दिसत आहे.
नक्की वाचा - Rahul Gandhi meets Modi: पंतप्रधान कार्यालयात मोदी- राहुल गांधी यांची बैठक, चर्चा काय झाली?
यावेळी शरद पवारांना पक्षाच्या भविष्याबद्दल विचारण्यात आलं होतं. यावर ते म्हणाले, सध्या पक्षात अजित पवारांसोबत जाण्याबाबत दोन मतप्रवाह आहे. एक गट अजित पवारांसोबत जाण्याबाबत सकारात्मक आहे, तर दुसरा गट कोणत्याही परिस्थितीत भाजपशी जोडला जाऊ इच्छित नाही. त्याऐवजी ते इंडिया आघाडीसोबत राहण्यास तयार आहे. सध्या INDIA आघाडी फार सक्रिय नाही. त्यामुळे सध्या स्वत:च्या पक्षाची पुनर्बांधणी करणं आणि अधिकाधिक तरुणांचा समावेश करून घेणं आवश्यक आहे.
सुप्रिया निर्णय घेईल...
शरद पवार म्हणाले, सुप्रियाला स्वत:ला निर्णय घ्यावा लागेल. संसदेत विरोधात बसायचं की नाही हा निर्णय सुप्रियाला घ्यावा लागेल.