मुख्यमंत्रिपदाबाबत शरद पवार पहिल्यांदाच थेट बोलले, मविआमध्ये नवा ट्विस्ट

मविआची भूमिका काय आहे? राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा विचार काय आहे याबाबतही शरद पवारांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली. शिवाय निवडणुकीतली दिशा काय असे हेही जाहीर करून टाकलं.

जाहिरात
Read Time: 3 mins
पुणे:

महाविकास आघाडीने आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करवा अशी आग्रही मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं केली आहे. शिवाय मविआच्या मेळाव्यातही उद्धव ठाकरे याबाबत थेट बोलले. त्या मेळाव्यात शरद पवारांनी थेट बोलणं टाळलं होतं. मात्र त्यांनी याबाबत आपली प्रतिक्रीया दिली आहे. त्यामुळे मविआमध्ये ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मविआची भूमिका काय आहे? राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा विचार काय आहे याबाबतही त्यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली. शिवाय निवडणुकीतली दिशा काय असे हेही जाहीर करून टाकलं. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुख्यमंत्री कोण होणार किंवा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याची चर्चा मविआमध्ये सध्या जोरात सुरू आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पहिल्यांदाच बोलले आहेत. त्यांनी आपल्या पक्षाची मुख्यमंत्रिपदाबाबतची भूमिकाच स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही इंट्रेस्ट नाही. शिवाय आम्ही कोणालाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करणार नाही. आमचे उद्देष्ठ हे राज्यातील सत्ता बदलणे हे आहे. राज्याला उत्तम प्रशासन देणे हे ध्येय आहे. राज्याला उत्तम पर्याय देणे यावर आम्ही लक्ष्य केंद्रीत केले पाहीजे असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत आता चर्चा करण्यात काही अर्थ नाही असेच एक प्रकारे स्पष्ट केले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 'दोन महिन्यात फाशीची शिक्षा', मुख्यमंत्री शिंदेंच्या त्या वक्तव्यात तथ्य किती? सत्य आले समोर

यावेळी जागा वाटपाबाबत शरद पवारांनी भाष्य केले. जागा वाटपासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र बदलापूर इथे झालेल्या प्रकरणानंतर ती रद्द करण्यात आली. आता ही बैठक याच महिन्या लवकर होईल असे त्यांनी स्पष्ट केले. या जागा वाटपाबाबत चर्चा होईल. या बैठकीला आपण उपस्थित राहाणार नाही. पण राज्यातले नेते उपस्थित असतील. मविआचे जागा वाटप लवकर व्हावी असे आपण त्यांना सुचना केल्या आहेत. त्यानुसार उमेदवारही लवकर निश्चित करता येतील असे त्यांनी सांगितले.

ट्रेंडिंग बातमी - लैंगिक अत्याचार, हत्या अन् मृतदेह ऊसाच्या शेतात फेकला; मामाच्या कृत्याने कोल्हापूर हादरलं!  

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर आंदोलनाबाबत केलेले वक्तव्य त्यांना करायला नको होते असे शरद पवार म्हणाले. ते त्यांना टालायला हवं होते. बदलापूर मध्ये जे झालं तो लोकांचा उद्रेक होता. जनतेच्या मनातला राग होता. त्यातुन हे आंदोलन लोकांनी उभं केलं. त्यात कोणाचाही राजकीय हस्तक्षेप नव्हता. त्याला राजकारणाचा अँगल देणे चुकीचे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. बदलापूर सारख्या घटना अनेक ठिकाणी होत असल्याच्या आपल्या निदर्शनास येत आहे. हे महाराष्ट्रासाठी चांगले नाही. याविरोधात व्यक्त होण्यासाठी उद्याच्या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन शरद पवारांनी यावेळी केले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  बीडमध्ये अज्ञात ड्रोनची दहशत , गावांची झोप उडाली, खडा पाहारा नक्की प्रकार काय?

बदलापूर सारख्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही. अशा वेळी जनजागृती महत्वाची आहे. ती करण्यासाठी उद्याचा बंद महत्वाचा असल्याचे शरद पवार म्हणाले. शिवाय गृह खात्याने बदलापूर प्रकरणात संवेदनशीलतेची भूमिका घेतली पाहीजे होती. लोकांची ती रिअँक्शन होती. त्यांच्या त्या भावना होत्या. त्यामुळे लोक एकत्र आले. असे असताना त्यांच्यावर खटले भरणे हे योग्य नाही. यामुळे गृह  विभागाने संवेदनशिल व्हावे असे शरद पवार या निमित्ताने म्हणाले.