जाहिरात

Political news: 'बारामती जिंकायची, सगळे आमदार आपलेच असायला हवे', शिंदेंच्या सेनेचा प्लॅन ठरला?

आपली स्वतःची ताकद भक्कम हवी. पक्षाने आदेश दिला तर शिरूर लोकसभा जिंकू असंही ते यावेळी म्हणाले.

Political news: 'बारामती जिंकायची, सगळे आमदार आपलेच असायला हवे', शिंदेंच्या सेनेचा प्लॅन ठरला?
पुणे:

शिवसेना शिंदे गटाचा मेळावा नुकताच पार पडला. या शिवसेनेच्या संवाद मेळाव्यात पुणे जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी बारामती जिंकण्याचा निर्धार केला. बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात आपलेच आमदार असायला हवेत, असं या बैठकीत आमदार शरद सोनवणे म्हणाले. विजय शिवतारे यांनी आपले सर्व आमदार निवडून आणले पाहिजेत, कारण राजकारणात काहीही होऊ शकते. उद्या आपल्याला स्वबळावरही लढावं लागेल असंही ते यावेळी म्हणाले. मात्र बारामतीबाबत विशेष उल्लेख केल्याने राजकीय वर्तूळात सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आपली स्वतःची ताकद भक्कम हवी. पक्षाने आदेश दिला तर शिरूर लोकसभा जिंकू असंही ते यावेळी म्हणाले. इतकचं नाही तर लोकसभा मतदार संघातले सर्व आमदार निवडून आणणार असं ही मेळाव्यात शरद सोनावणे म्हणाले. यावरून शिवसेना शिंदे गटाने आपली भूमीका स्पष्ट केली आहे. आगामी काळात अजित पवारांच्या ताब्यात असलेल्या बारामती आणि शिरूरवरही शिवसेनेचा डोळा असल्याचे स्पष्ट आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Crime News : पत्नीची हत्या केली अन् मृतदेह सूटकेसमध्ये भरला; पुण्याच्या IT इंजिनिअरला अटक

विजय शिवतारे यांनीही यावेळी जोरदार फटकेबाजी केली. जेंव्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते, तो काळ महाराष्टसाठी सुवर्णकाळ होता. प्रत्येकाने सांगितले पाहीजे की आपण शिंदेंच्या नेतृत्वात काम करत आहोत.त्यांनी मुख्यमंत्री असताना अठरा अठरा तास काम केले आहे. गेल्या 70 वर्षांत जे घडलं नाही, ते शिंदेंनी करून दाखवलं आहे असं ही ते म्हणाले. महिलांना सक्षम करण्याचा निर्णय ही त्यांनीच घेतला. त्यासाठी 45 हजार कोटी रुपये दिले गेले. एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री झाले नसते तर दुसऱ्या कुठल्याच मुख्यमंत्र्यांने असं धाडस केलं नसतं असं ही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Political News : "बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगला घशात घातला"; उद्धव ठाकरेंच्या टीकेला मनसेचं प्रत्युत्तर

महिलांना त्यांनी स्वाभिमानी बनवल हे त्यांच्या मुळे शक्य झालं. सर्वसामान्य माणसाचा संसार सोन्याचा झाला पाहिजे यासाठी एकनाथ शिंदे काम करतात. तुमचा आमचा नेता हा शिंदे आहेत. त्या जबाबदारीनेच आपल्याला वागलं पाहिजे असं ही ते म्हणाले. जो माणूस मोठा होतो त्याला दुश्मन देखील जास्त असतात. पण त्यातून ही पक्ष वाढवायचा असतो. पुण्यात गटबाजी तटबाजी बाजूला ठेवा. जिल्ह्यात मनुष्यबाणावर मी एकटाच आमदार झालो. पक्षाची ताकद आता वाढवायची आहे.  

ट्रेंडिंग बातमी - Myanmar Earthquake : म्यानमार दोन शक्तीशाली भूकंपाने हादरला; इमारती, पूल कोसळले, नागरिकांची पळापळ

जिथे छत्रपतींचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला म्हणजे जुन्नर देखील आपल्याकडे आणि जिथे संभाजी महाराजांचा जन्म झाला तो पुरंदर देखील आपल्याकडे आहे. मी आणि शरद सोनवणे तिथून आमदार आहोत. लोकांमधून निवडून यायचं असेल तर सलोख्यानं वागलं पाहिजे. पक्षावर प्रेम पाहिजे, एकनिष्ठ असलं पाहिजे. आता आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा. युती होईल की नाही याचा नंतर विचार करा पक्षाची ताकद संपूर्ण मतदार संघात वाढवा असंही ते म्हणाले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: