जाहिरात

शिवलेल्या कोटचं काय करणार? गोगावलेंनी एका वाक्यात विषय संपवला

या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नसतील. पण गोगावलेंना आपण मंत्री असू असं पुन्हा एकदा वाटू लागलं आहे.

शिवलेल्या कोटचं काय करणार? गोगावलेंनी एका वाक्यात विषय संपवला
मुंबई:

कोट तयार आहे. मंत्री होणार आणि  नक्की मंत्री होणार असं भरत गोगावले नेहमी सांगत राहीले. पण गोगावले काही मंत्री झाले नाहीत. शिवाय  शिवलेला कोटही घालण्याचा त्यांना योग आला नाही. त्यांची बोळवण एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी झाली. त्याच वेळी निवडणूक लागली आणि गोगावलेंचं कोट घालून मंत्रिपदाची शपथ घेण्याचं स्वप्न अपूर्णच राहीलं. आता नवं सरकार येणार आहे. या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नसतील. पण गोगावलेंना आपण मंत्री असू असं पुन्हा एकदा वाटू लागलं आहे. त्यांनी आपल्या मनातली इच्छा पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भरत गोगावले हे चार वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळी ते सतत आपण मंत्री होणार असं सांगायचे. शिवाय शपथ घेण्यासाठी आपला कोटही शिवून तयार आहे असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यावरून नंतर गोगावले यांची टिंगलही उडवली गेली. पण तरीही ते शेवटपर्यंत मंत्री होणार हे सांगत राहीले. पण ते काही मंत्री झाले नाही. आता निवडणुका झाल्या आहेत. महायुतीचं सरकारही येणार आहे. या सरकारमध्ये आपण मंत्री होवू असं पुन्हा एकदा गोगावले यांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातमी - कोणाच्या वाट्याला कोणती खाती? शिंदे- पवारांच्या पदरात काय? संभाव्य मंत्रिमंडळाची यादी आली

मला मंत्री व्हायचं आहे. तशी इच्छा आहे. शिवाय रायगडचा पालकमंत्री ही होणार आहे. त्याचे संकेत मिळत असल्याचेही भरत गोगावले म्हणाले. मागील वेळी जी उणीव राहील होती ती यावेळी भरून निघेल असंही ते म्हणाले. आपण चौथ्या वेळी निवडून आलो आहोत. शिवाय मंत्री होण्याची इच्छा बाळगणे काय चुकीचे नाही असं म्हणत यावेळी आपण नक्की मंत्री होणार असं ते म्हणाले. शिवाय त्या कोटचं काय होणार असंही त्यांना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले कोटचं विचारू नका. पुढच्या चार पाच दिवसात काय होतं हे तुम्हाला नक्की समजेल. असं म्हणत त्यांनी कोट बाबत अधिक बोलणं टाळलं. पण तो कोण आपण नक्की घालू याचे संकेत मात्र त्यांनी दिले.   

ट्रेंडिंग बातमी - Big News : एकनाथ शिंदे यांचा उपमुख्यमंत्रिपद घेण्यास नकार, खात्रीलायक सूत्रांची माहिती

दरम्यान मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागेल याबाबतही त्यांनी वक्तव्य केलं आहे. नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची की नाही हे एकनाथ शिंदे ठरवतील. ज्या लोकांनी चांगलं काम केलं आहे त्यांना संधी मिळेल. पण ज्याची कामगिरी निराशजनक आहे त्यांना डावललं जाईल असंही ते म्हणाले. याचे सर्वाधिकार हे शिंदेंना दिले असल्याचंही ते म्हणाले. याबाबत पाच दिवसात सर्व गोष्टी स्पष्ट होतील असंही त्यांनी सांगितलं. गोगावले यांच्या प्रमाणे संजय शिरसाटही मंत्री होण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे पहिल्याच शपथविधीत संधी मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे.  

ट्रेंडिंग बातमी - लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार? आता या महिलांनाच मिळणार लाभ

आम्ही महायुतीत आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आम्ही एकत्रीत लढू. जर स्वबळावर लढायच्या असतील तयारी नक्की करू असंही ते म्हणाले. तयारी करणं काही चुकीचं नाही असंही ते म्हणाले. मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींनाही संधी मिळेल असं ही ते म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्र्यांना गावाला आराम करण्यासाठी जाण्याचा सल्ला आम्हीच दिला असल्याचेही ते म्हणाले. ते थकले होते त्यामुळे थोडा आराम गरजेचा होता असंही ते गागावले यांनी सांगितलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com