लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट इंडिया आघाडीचा भाग होता. आघाडी म्हणून दोन्ही निवडणूका लढल्या गेल्या. लोकसभेत इंडिया आघाडीला यश मिळालं. पण विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ला. त्यानंतर इंडिया आघाडीत चलबिचल दिसून येत आहे. इंडिया आघाडीतील देशभरातील नेते आता आघाडीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यात आता शिवसेना ठाकरे गटानेही स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे काँग्रेस नेते नसिम खान यांनी स्वागत केले आहे. शिवाय काँग्रेसही स्वबळावर लढेल असं वक्तव्य केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढाव्यात अशी कार्यकर्त्यांची मागणी असते. अनेक पक्ष त्या युती किंवा आघाडीत लढत नाहीत. त्यामुळेच शिवसेना ठाकरे गटाने आगामी निवडणुकींबाबत स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेसने या निर्णयाचे स्वागत केले आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नसिम खान यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. शिवसेनेनं असा निर्णय घेतला असेल तर काँग्रेसही स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. कार्यकर्त्यांची तशी मागणी आहे. आगामी काळात काँग्रेसही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढेल असं त्यांनी स्पष्ट केलं.
ट्रेंडिंग बातमी - India Alliance: इंडिया आघाडीत खरोखर फूट पडली आहे का? पडद्यामागे काय घडतंय?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचे वक्तव्य केले होते. कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्व पक्षानी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहे असं राऊत यांनी स्पष्ट केलं होतं. तर सुप्रिया सुळे यांनी ही कार्यकर्त्यांना न्याय मिळालाच पाहीजे असं म्हणत स्वबळाचे संकेत दिले होते. त्यामुळे मविआतील काँग्रेसही आता एकला चलो रेच्या भूमीकेत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world