आज 7 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित 173 आमदारांचा शपथविधी पार पडला. अनेकांनी संस्कृतमध्ये विधीमंडळ सदस्यत्वपदाची शपथ घेतली. विरोधी पक्षांनी निषेध व्यक्त करीत शपथविधीला येण्यास नकार दिला. दरम्यान अनेक कारणांनी हा शपथविधी स्मरणात राहिला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्येने पहिल्यांदाच विधिमंडळात पाऊल ठेवलं. श्रीजया चव्हाण यांच्या शपथविधी दरम्यान चव्हाण कुटुंब उपस्थित होतं. कोरियन ड्रामाच्या फॅन असलेल्या श्रीजया चव्हाण यांचं एक वेगळच रुप यावेळी पाहायला मिळालं.
नक्की वाचा - नाराजी, घोषणाबाजी अन् हटके एन्ट्री; विशेष अधिवेशन जोरदार गाजलं, वाचा 10 वैशिष्ट्ये
श्रीजया पोडियमजवळ पोहोचल्यावर आधी त्यांनी चप्पल काढली आणि नंतप शपथ घेतली. यामुळे त्यांचं कौतुक केलं जात आहे. शपथ घेण्यापूर्वी त्यांनी आजोबा शंकरराव चव्हाण यांच्याही नावाचा उल्लेख केला. शपथ पूर्ण झाल्यानंतर श्रीजयांनी चप्पल घातली. स्वाक्षरी केल्यानंतर विधानसभेचे हंगामी अध्यक्षांना वाकून नमस्कार केला आणि त्या बाहेर पडल्या.
नक्की वाचा - विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेना -राष्ट्रवादीला नाहीच? भाजपचा उमेदवारही ठरला?
आमदार श्रीजया चव्हाण यांच्या शपथविधीची वैशिष्ट्ये
- श्रीजया चव्हाण या चव्हाण कुटुंबातील चौथ्या आमदार आहेत.
- यापूर्वी डॉ. शंकरराव चव्हाण, अशोकराव चव्हाण, सौ. अमिता चव्हाण विधानसभेच्या सदस्य राहिल्या आहेत.
- विशेष म्हणजे चौघेही भोकर विधानसभा मतदारसंघ (परिसीमनपूर्वी मुदखेड) या एकाच मतदारसंघातून निवडून आले आहेत.
- श्रीजया चव्हाण यांनी आज विधानसभेत शपथवाचन सुरु करण्यापूर्वी आजोबा डॉ. शंकरराव चव्हाण यांचे महाराष्ट्राचे भगिरथ म्हणून आवर्जून स्मरण केले.
- विधानसभा सदस्यत्वाचा बॅच मिळाल्यानंतर श्रीजयांनी अतिशय अभिमानाने आई सौ. अमिता चव्हाण यांच्या हस्ते तो बॅच आपल्या ड्रेसवर लावून घेतला.
- शपथ घेण्यापूर्वी श्रीजया चव्हाण यांनी चप्पल काढून ठेवली व नंतरच शपथेला प्रारंभ केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world