जाहिरात

कोल्हापूरच्या राजकारणानं गाठला तळ, हसन मुश्रीफांनी आक्षेपार्ह शब्द वापरत केली टीका

कोल्हापूर जिल्ह्यातल्या राजकारणानं आता तळ गाठला आहे. हसन मुश्रीफांनी आक्षेपार्ह भाषा वापरत विरोधकांवर टीका केली आहे.

कोल्हापूरच्या राजकारणानं गाठला तळ, हसन मुश्रीफांनी आक्षेपार्ह शब्द वापरत केली टीका
कोल्हापूर:

विशाल पुजारी, प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल विधानसभेच्या निवडणुकीची चुरस चांगलीच वाढली आहे. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विद्यमान आमदार हसन मुश्रीफांचं नाव जाहीर केलं आहे. अजित पवारांनी नाव जाहीर करताच देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी समरजीत घाटगे यांनी भाजपाला रामराम ठोकला. घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. कागलमधून ते तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार हे देखील स्पष्ट झालं आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे हे कागलचे दोन्ही प्रमुख उमेदवार या निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. घाटगे यांनी रविवारी पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी मतदारांचा एक मेळावा घेतला. सुप्रिया सुळे यांनी या मेळाव्याला उपस्थित होत्या. त्यांनी या मेळाव्यात हसन मुश्रीफांवर जोरदार टीका केली. त्याला उत्तर देताना मुश्रीफ यांनी समरजीत घाटगे यांच्याबद्दल नाव न घेता आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. 

काय म्हणाले मुश्रीफ?

'ज्या लोकांमुळे ईडी लागली त्यांना जवळ करू नये. माझ्यावर ईडी कोणामुळे लागली  हे समजून घ्यावं. मला तरी असं वाटतं की सुप्रियाताईंनी मुळातच ही सर्व गोष्ट समजून घ्यायला हवी. अशा ह***खोर लोकांच्या कार्यक्रमाला जाऊ नये असं मुश्रीफ म्हणाले. ही निवडणूक अत्यंत चुराशीची असणार आहे. निवडणुक निकालानंतर ही चुरस समोर येईलच, असंही मुश्रीफ यांनी सांगितलं. 

( नक्की वाचा : '....तर महाराष्ट्राला कुत्र्याचं मटण खावं लागेल', भाजपा आमदार पडळकरांची जीभ घसरली )
 

सुप्रिया सुळे यांनी काय आरोप केले?

कागलमध्ये ज्यावेळी ईडी आली, तेव्हा घरातील पुरुष मागे बसले होते आणि महिला पुढे येऊन म्हणाली मी माझ्या घरात घुसू देणार नाही. याला महिला म्हणतात. ही आमची ताकद असल्याचं सांगत सुप्रिया सुळे यांनी मुश्रीफांवर टीका केली होती. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
'....तर महाराष्ट्राला कुत्र्याचं मटण खावं लागेल', भाजपा आमदार पडळकरांची जीभ घसरली
कोल्हापूरच्या राजकारणानं गाठला तळ, हसन मुश्रीफांनी आक्षेपार्ह शब्द वापरत केली टीका
badlapur akshay shinde encounter case opposition reaction on state government action
Next Article
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण, विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर गंभीर शब्दांत टीका