Uddhav Thackeray Shivaji Park Speech : "पहिल्या वाक्यापासूनच उद्या चर्चा सुरु होईल. राज मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो म्हणाले आणि उद्धव ठाकरे हिंदू बांधवांनो भगिनींनो मातांनो म्हणाले.हेच तर आमचं म्हणणं आहे.कारण मुंबई महापालिकेच्या महापौर कोण होणार? ही सुरुवात त्यांनीच केली.ते म्हणतात हिंदू महापौर होणार. मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाहीत..हा माझा पहिला प्रश्न त्यांना आहे. आम्ही अस्सल मराठी बोलणारे देशभक्त हिंदू आहोत. राजने आज अप्रतिम मांडणी केली. राजने आज सांगितलं की, पोटभरून जेवण तुम्हाला देणार आहेत.आता एवढं पोट भरल्यानंतर किंवा पोट तिडकीने त्यांनी सांगितल्यानंतर पोटाला तड लावून उपयोग नाही. डोक्यात तिडीक गेली पाहिजे.ती जर जाणार नसेल, तर छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. जय भवानी, जय शिवाजी बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही", असं मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते शिवशक्ती सभेत बोलत होते.
"शिवसेना संपवण्यामागचा यांचा डाव काय होता.."
आजच्या सभेचं है वेशिष्ट्य आहे, जसं आपल्या सर्वांना आजपर्यंतचा शिवसेनेचा इतिहास माहित आहे.तसच मला ती पहिला सभा आजही आठवतेय.मराठी माणसावर अन्याय होतोय, तो नेमका काय होतोय? हे कळण्याचं वय नव्हतं. आज या सर्व गोष्टींची जाणीव होते. त्यावेळी मी इथे समोर बसलो होतो. आज आमच्या खांद्यावर धुरा आली आहे. आज सगळ्यांना कळलं असेल की ठाकरे बंधू एकत्र का आले? भावकी एक झाली आहे आता गावकी पण एक होत आहे. अनेक जण प्रश्न विचारत होते की, ही ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे का? ठाकरेंचं अस्तित्व ठरवणारं कोणी जन्माला आलं नाही.ही सगळी लाचार माकडं ही कधी वाघ नाही बनू शकत..आता तुमच्या लक्षात आलं असेल की शिवसेना संपवण्यामागचा यांचा डाव काय होता?
नक्की वाचा >> Jayant Patil : "काही गद्दार..काही दिल्लीतील गुलाम..", जयंत पाटील यांचा घणाघात, "आता दोन्ही भाऊ.."
"मराठी माणसांसाठी, हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आलो"
उद्धव ठाकरे असंही म्हणाले की, "संयुक्त महाराष्ट्रच्या लढ्यावेळी आचार्य आत्रे होते. एस एम जोशी, डांगे होते. पहिले पाच जण जे पुढे होते त्यात आमचे आजोबा प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे होते. ही आमची घराणेशाही म्हणा किंवा घराण्याची परंपरा म्हणा. मराठीचं प्रेम, मातृभाषेचं प्रेम रक्तात असावं लागतं. आमच्या डोळ्यादेखत जर आमच्या घराचे, राज्याचे, भाषेचे लचके तोडले जाताना आम्ही काय शेपट्या घालून घरी बसू असं त्यांना वाटलं..अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो. मराठीसाठी एकत्र आलो आहे. आमच्यात ते वाद नव्हते. ते वाद गाडून टाकलेले आहेत. मराठी माणसांसाठी, हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक ताकद म्हणून उभे राहिलेलो आहोत. निवडणूक महापालिकेची आहे. प्रत्येक निवडणूक आल्यावर भाजपवाले रोम्बा सोम्बा खेळायला लागतात. हिंदू मुस्लीम..मराठी-अमराठी..महापौर कोण होणार? असं राजकारण भाजपने सुरु केले".