उद्धव ठाकरेंनी घातलं काँग्रेसचं उपरणं ! बाळासाहेबांचं नाव घेत म्हणाले...

Advertisement
Read Time: 3 mins
U
मुंबई:

उद्धव ठाकरे यांनी भाजपाची साथ सोडून महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करुन आता चार वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. या काळात ठाकरे ही काँग्रेसची बी टीम असल्याची टीका भाजपाकडून सातत्यानं होत आहे. त्यातच मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या सद्धभावना मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचं उपरणं घातल्यानं त्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नेमकं काय घडलं?

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्तानं मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात सद्भभावना मेळावा पार पडला. या मेळाव्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांसह शरद पवार आणि उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना काँग्रेसचे उपरणे घातले.

उद्धव ठाकरे यांनी थोडावेळ हे उपरणे गळ्यात ठेवले. त्यानंतर ते काढले. त्यावेळी काँग्रेस नेते भाई जगताप हे उद्धव ठाकरे यांना ते उपरणं गळ्यात ठेवण्याचा आग्रह करत होते. उद्धव ठाकरे यांनी थोड्यावेळानं भाषण सुरु केलं त्यावेळी त्यांच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं नव्हतं. पण, सर्वांच्या चर्चेचा विषय त्यांनी काही काळ घातलेलं उपरणं होतं. 

( नक्की वाचा : 'MVA सरकारचा मला अटक करण्याचा प्लॅन होता' CM एकनाथ शिंदेंचा खळबळजनक आरोप )
 

बाळासाहेबांचा उल्लेख

उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात देखील याच प्रसंगानं केली. आपण काँग्रेसचं उपरणं घातलं त्याचीही बातमी होईल, असं ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण केलं. 'मी काॅग्रेस विरोधात बाळासाहेब ठाकरे यांची भाषण ऐकत मोठा झालो. आम्ही सूड भावनेन कधीच बोललो नाही, असं त्यांनी सांगितलं. आम्ही विरोध केला पण त्यात सूड भावना कधीच नव्हती. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे वेगळेच स्नेह होते. एनसीपीपेक्षा सत्तेत कमी राहिलो पण जोरदार विरोधात बोलायचो,'  असं त्यांनी सांगितलं. 

Advertisement

( नक्की वाचा : '... तर त्याच क्षणी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल', देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य )
 

'आम्हीच भूतं बसवली'

माणुसकीचा भाव आता राजकारणात कमी होत जातोय. आम्ही विरोधात होतो पण ईडी सीबीआय कधी नव्हती. आम्हीच भूत बसवली, आम्हाला उशीरा कळाले. आम्हाला उशीरा समजले. ज्या शिवसेनेसोबत तुम्ही सत्तेत आला त्याच मित्राला संपवण्याचं काम तुम्ही केलं, अशी टीका ठाकरे यांनी केली.  राजीव गांधी यांनी मोठे लसीकरण केले पण त्यावर फोटो लावले नाहीत,  असा टोला त्यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला. 

उद्धव ठाकरे यांनी या भाषणात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्याचं कौतुक केलं. त्यांनी कोणतीही घोषणा न देता 400 पार केले. सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. वन नेशन वन इलेक्शन मग महाराष्ट्र त्यात येत नाही का? हा सवाल त्यांनी यावेळी विचारला. 

Advertisement

काॅग्रेससोबत गेले की हिंदुत्व सोडले, पण ते आरएसएस संपवू असे म्हणणारे नितेश कुमार कसे चालतात? भाजपाचे हिंदुत्व मला मान्य नाही. दुसर्यावर अन्याय करणारे हिंदुत्व माझे नाही, असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं. लोकसभा करून दाखवले , पण सुफडा साफ झाला नाही, विधानसभेत सुफडा साफ करायचा, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. 

बदलापूरवर का बोलत नाहीत?

बंगालमध्ये झालेल्या कृत्याचे समर्थन कधीच नाही, आरोपीला शिक्षा दिलीच पाहिजे. बदलापूर प्रकरणात का बोलत नाहीत. तेथील लाडकी लेक पैसे नको पण सुरक्षा द्या, असं म्हणत आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात केली. 

Advertisement
Topics mentioned in this article