Vasai News: वसईत भाजपला मोठा झटका;आगरी सेनेच्या मोठ्या नेत्याचा हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीत प्रवेश

Vasai News: वसई-विरार राजकारणात मोठी घडामोड घडलीय. आगरी सेनेचे पालघर जिल्हा प्रवक्ते जयेश पाटील यांनी पदाचा राजीनामा देत हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Vasai Virar News: वसई विरारच्या राजकारणात मोठा भूकंप"
NDTV Marathi

- मनोज सातवी, प्रतिनिधी
Vasai News:
वसई-विरारच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. भाजपसोबत युतीत असलेल्या आगरी सेनेला मोठे खिंडार पडले आहे. आगरी सेनेचे पालघर जिल्हा प्रवक्ते जयेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन अधिकृतपणे बहुजन विकास आघाडीमध्ये (बविआ) प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही 'बविआ'चा झेंडा हाती घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

जयेश पाटील यांचा पक्षप्रवेश सोहळा विरार येथील विवा कॉलेजमध्ये पार पडला. यावेळी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी जयेश पाटील आणि त्यांच्या समर्थकांचे स्वागत केले. जयेश पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच आगरी सेनेच्या प्रवक्ता पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासूनच ते कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी 'बविआ'चा पर्याय निवडत नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे.

(नक्की वाचा: Pune News: मुलाचे डोळेच काय पूर्ण शरीर घ्या! पुण्यात 21 वर्षीय लेकासोबत घडली भयंकर घटना, वडिलांचा मोठा निर्णय)

भाजपला मोठा धक्का

आगरी समाजात जयेश पाटील यांचे दांडगे जनसंपर्क आणि नेटवर्क मजबूत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबत असलेल्या आगरी सेनेतील ही फूट भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.  

Advertisement

(नक्की वाचा: Pune News: पुण्याच्या मिस इंडिया अर्थचा होमहवन करत हिंदू धर्मात प्रवेश, पती आतिफवर गंभीर आरोप; छळाची मांडली आपबिती)

विकासासाठी एकत्र आलो - जयेश पाटील

प्रवेशानंतर बोलताना पाटील म्हणाले की, "हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वसई-विरारच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि सर्वांगीण विकासासाठी मी हा निर्णय घेतला आहे." या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणाचे समीकरण पूर्णपणे बदलले असून 'बविआ'ला आगरी समाजाची मोठी साथ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement