वसंत मोरेंचं ठरलं! इंजिन सोडलं, रोड रोलरवर चढले,आता हाती मशाल घेणार

आता आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता वसंत मोरेंनी नवी इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ते वंचितची साथ सोडणार आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

पुण्याच्या वसंत मोरे यांनी नवा राजकीय निर्णय घेतला आहे. राज ठाकरेंचे विश्वास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंत मोरेंनी लोकसभा निवडणुकीत मनसेची साथ सोडली. काँग्रेस राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. शिवाय त्यांना पुणे लोकसभेची उमेदवारीही मिळाली. पण मोरे त्यात त्यांचा पराभव झाला. शिवाय त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता वसंत मोरेंनी नवी इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ते वंचितची साथ सोडणार असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्या पक्षा प्रवेशाची तारीखही आता निश्चित झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वसंत मोरे मशाल हाती धरणार 

वसंत मोरे यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांचे समर्थक उपस्थित होते. तर संजय राऊत विनायक राऊतही यावेळी उपस्थित होते. वंचितमध्ये असलेले वसंत मोरे आता ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत हे निश्चित झाले आहे. मोरे यांचा पक्ष प्रवेश 9 जुलैला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभेत शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली यासाठी मोरे यांनी प्रयत्न केले होते. त्यावेळी त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली होती. पण आघाडीत ही जागा काँग्रेसकडे असल्याने मोरे यांना कोणतेही आश्वासन देण्यात आले नाही. आता मात्र मोरे यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मनसे, वंचितनंतर मोरे आता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री दाखवा अन् 1 गावठी कोंबडा, वलगणीचे मासे बक्षीस मिळवा'

कोण आहेत वसंत मोरे? 

वसंत मोरे हे पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत. ते पुणे मनसेचे शहर अध्यक्षही होते. पालिका अधिकाऱ्याची  गाडी त्यांनी हातोड्याने फोडली होती. त्यानंतर ते चर्चेत आले होते. एक आक्रमक नेते म्हणून त्यांची पुण्याला ओळख आहे. पुणे लोकसभेची जागा मनसेने लढवाली अशी त्यांची मागणी होती. तशी इच्छाही त्यांनी राज ठाकरेंकडे व्यक्त केली होती. राज यांच्या अत्यंत जवळचे नेते म्हणूनही त्यांची ओळख होती. पण त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. शिवाय त्यांचे आणि अमित ठाकरे यांचेही बिनसले. त्यामुळे वसंत मोरे यांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - संत तुकाराम महाराजांची पालखी अडवली, सरपंच-उपसरपंचासह ग्रामस्थांवर गुन्हे दाखल

आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता 

वसंत मोरे यांची लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती. त्यानुसार त्यांनी ती निवडणूक लढवलीही. पण त्यात त्यांना अपयश आले. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला ते लागले आहेत. त्या दृष्टीनेच ते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटाकडून पुण्यातल्या कोणत्याही मतदार संघात उमदवारी मिळाल्यास निवडणूक लढण्याची त्यांची तयारी असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे विधानसभा डोळ्या समोर ठेवून मोरेंचा पक्ष प्रवेश होत असल्याची चर्चा पुण्यात रंगली आहे.    

Advertisement