जाहिरात

मनसेचं व्हिजन वरळी... संदीप देशपांडेंच्या 'त्या' ट्वीटची चर्चा का?

सर्वाचं लक्ष लागलं आहे ते वरळी विधानसभा मतदार संघाकडे या मतदार संघातून मनसे नेते संदीप देशपांडे हे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

मनसेचं व्हिजन वरळी... संदीप देशपांडेंच्या 'त्या' ट्वीटची चर्चा का?
मुंबई:

विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्ष करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही तयारीला सुरूवात केली आहे. त्यांनी महाराष्ट्राचा दौराही केला. काही ठिकाणचे उमेदवारही जाहीर केले. मात्र सर्वाचं लक्ष लागलं आहे ते वरळी विधानसभा मतदार संघाकडे या मतदार संघातून मनसे नेते संदीप देशपांडे हे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने त्यांनी तयारीही सुरू केली आहे. आता त्यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तूळात वेगळी चर्चा सुरू झाली आहे. त्यात त्यांनी तुमचं व्हिजन. आमचं व्हिजन. आपलं व्हिजन. व्हिजन वरळी असे ट्वीट केले आहे. त्याचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मनसे नेते संदीप देशपांडे वरळी विधानसभेतून निवडणूक लढणार आहेत. वरळी विधानसभेत विद्यमान आमदार आदित्य ठाकरे आहेत. आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे अशी लढत वरळी विधानसभेत पाहायला मिळणार आहे. सध्या ही लढत चर्चेत असतानाच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केले आहे. व्हिजन वरळी. मनसे कडून विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वरळी संदर्भातील व्हिजन लवकरच मांडण्यात येणार आहे. वरळीत काय विकासात्मक काम केली जाऊ शकतात याबाबतचे व्हिजन मनसेकडून मांडण्यात येणार आहे. त्याचाच खुलासा या ट्विटमधून करण्यात आला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - चिकनपाडा तिहेरी हत्याकांडाचा छडा लागला, आरोपीची एक चुक अन् खेळ खल्लास

वरळी विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा गड समजला जातो. आदित्य ठाकरे हे या मतदार संघातून विजयी झाले आहेत. त्यांच्या दिमतीली दोन विधान परिषदेचे आमदार आहेत. ते याच मतदार संघात आहेत. शिवाय माजी महापौरही याच मतदार संघात राहातात. त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी ही सेफ जागा समजली जाते. मात्र मनसेने या मतदार संघात आदित्य ठाकरें समोर आव्हान उभं केलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून वरळी विधानसभेतून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांना अगदीच कमी मताधिक्य मिळाले होते. ही आदित्य यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. तर विरोधकांचा उत्साह वाढवणारी ही गोष्ट आहे. 

ट्रेंडिंग बातमी - हर्षवर्धन पाटील लढणार की माघार घेणार? इंदापूर विधानसभा कोणाच्या पारड्यात?

मनसेकडून संदीप देशपांडे हे उमेदवार असतील असे संकेत राज ठाकरे यांनी या आधीच दिले आहेत. जरी उमेदवारीची घोषणा केली नसली तरी संदीप देशपांडे यांचा वावर या मतदार संघात वाढला आहे. त्यांनी गाठीभेटी घेणे ही सुरू केले आहे. शिवाय त्यांनी वरळीत काय मिशन असेल हे निश्चित केले आहे. काही दिवसात ते याची घोषणा करतील. देशपांडे यांनी या आधी ही विधानसभेची निवडणूक लढवली आहे. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. यावेळी ते ठाकरेंना आव्हान देण्यास सज्ज आहे. त्यादृष्टीने त्यांनी तयारीही सुरू केली आहे. 


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com