देवा राखुंडे
दिवसेंदिवस वाल्मीक कराडचे नवनवे कारनामे उघड होऊ लागले आहेत. अशातच वाल्मीक कराडवर राज्यातील ऊस तोडणी हार्वेस्टर चालकांकडून सबसिडीपोटी करोडो रुपये उखळण्याचा आरोप होत आहे. यात पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काही ऊस तोडणी यंत्र चालकांचाही समावेश आहे. फसवणूक झालेल्या या ऊस तोडणी चालकांनी थेट सुप्रिया सुळे यांची भेट घेत न्यायाची मागणी केली आहे. त्यामुळे वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना हा प्रकार घडला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यानंतर वाल्मीक कराड राज्यात नव्हे तर देशात चर्चेत आला. याच वाल्मीक कराडचे दिवसेंदिवस नवे कारनामे आता उघड होऊ लागले आहेत. वाल्मीक कराड वर विविध आरोप होत असताना केंद्र आणि राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या ऊस तोडणी यंत्राच्या सबसिडी पोटी करोडो रुपये उखळल्याचा आरोप ही त्याच्यावर होत आहे. बारामती तालुक्यातील रामचंद्र भोसले यांच्यासह अन्य ठिकाणच्या 140 ऊस तोडणी यंत्र चालकांकडून वाल्मीकने प्रत्येकी आठ लाख रुपये घेतले. असा आरोप शेतकरी करत आहेत. परळीमधील अनुसया लॉजवर वाल्मीक कराडने ही रक्कम स्विकारली होती असं ही शेतकरी सांगत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व शेतकरी धनंजय मुंडे यांना भेटले होते.
धनंजय मुंडे यांनीच वाल्मीक कराडला भेटण्याचा सल्ला दिला होता असा आरोप रामचंद्र भोसले या शेतकऱ्याने केला आहे. फसवणूक झालेल्या या शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची बारामतीत भेट घेतली. सुळेंसमोर या शेतकऱ्यांनी व्यथा मांडली. सुळेंनी प्रकरण समजून घेत पुण्याच्या एसपींना फोन लावला. आता पुणे एसपी यांनी या शेतकऱ्यांना बैठकीला बोलावलं आहे. ते या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतली. त्यानंतर किती पैसे लुटले आहेत याचीही ते माहिती घेतली. या प्रकरणामुळे वाल्मीकचे कारनामे बीड नाही तर बीडच्या बाहेरही सुरू होते हे आता स्पष्ट झालं आहे.
140 शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 8 लाखा प्रमाणे 11 कोटी पेक्षा जास्त रुपये वाल्मीक कराडने या शेतकऱ्यांकडून उकळल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे सर्व शेतकरी बारामतीचे आहेत. संतोष देशमुख यांच्या हस्ते प्रकरणी वाल्मीक कराडवर आरोपांच्या फैरी सुरू आहेत. त्यातच ऊस तोडणी मालकांकडून वाल्मीकने करोडो उखळल्याचा आरोप होतोय. त्यामुळे वाल्मीकचे पाय आणखीनच खोलात जाणार हे निश्चित आहे. पुण्यातही वाल्मीकने मोठ्या प्रमाणात आपली प्रॉपर्टी केली आहे. त्यावरून त्याच्यावर चौकशीची टांगती तलवार आहे. त्यात आता या नव्या प्रकरणाने त्याच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world