जाहिरात

Waqf Bill: 'हिंदूच्या देवस्थान कमिटींमध्ये गैर हिंदू घुसवणार आहात का?' अरविंद सावंतांची जोरदार फटकेबाजी

तुमच्या मनात नेमकं काय आहे? पुढे तुम्ही हिंदू मंदीरांच्या देवस्थान समित्यांमध्ये ही गैर हिंदू घेणार आहात का? असा खडा सवाल सावंत यांनी केला.

Waqf Bill: 'हिंदूच्या देवस्थान कमिटींमध्ये गैर हिंदू घुसवणार आहात का?' अरविंद सावंतांची जोरदार फटकेबाजी
नवी दिल्ली:

वक्फ सुधारणा विधेयकावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत जोरदार फटकेबाजी केली. वक्फ बोर्डात गैर मुस्लीम सदस्य घेतले जाणार आहेत. भविष्यात तुम्ही हिंदूंच्या मंदीर कमिटीमध्ये ही गैर हिंदू लोक घुसवणार आहात का? तसा तुमचा मानस आहे का? असा खडा सवाल अरविंद सावंत यांनी केला. तस करण्याचा काही विचार असेल तर शिवसेना तसं कधी ही होवू देणार नाही. त्याला शिवसेनेचा विरोधच असेल असं सावंत यांनी स्पष्ट केलं. वक्फ बोर्डावर दोन गैर मुस्लीम सदस्य घेतले जाणार आहेत. हे नव्या विधेयकात आहे. त्यावर बोट ठेवत सावंत यांनी सरकारला घेतलं. शिवाय पुढे शिख, ख्रिश्चन, यांच्यात ही अशा पद्धतीचा हस्तक्षेप होवू शकतो अशी भिती ही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वक्फ सुधारणा विधेयकाच्या जेपीसीमध्ये आपण होतो. पण तिथे कधीच मुद्द्यांवर चर्चा झाली नाही. हे दुर्दैव आहे. ज्यांचा संबंध नाही अशी लोक ही तिथे येवून बोलत होते असं सावंत या चर्चे वेळी म्हणाले. हे विधेयक का आणले जात आहे. त्याचे उद्दीष्ट काय आहे. भाजपच्या कथनी आणि करणीत जमीन आस्मानचा फरक आहे असं ही ते यावेळी म्हणावे. तुम्ही हे विधेयक न्याय देण्यासाठी आणलं नाही असा आरोपही यावेळी सावंत यांनी केला. मुख्यमंत्री आम्हाला सांगतात हिंदूत्वाच्या बाजूने मतदान करणार का?  हे आम्हाला हिंदूत्व शिकवणार का? असा सवाल ही यावेळी सावंत यांनी केला. 

ट्रेंडिंग बातमी - Waqf Bill: 'वक्फची जमीन सोडा, चीनने किती जमीन हडप केली सांगा' अखिलेश यादव भडकले

पद्मनाभ मदीराचा खजीना बाहेर काढण्यात आला. तो कुणी काढला? का काढला? केदारनाथ मंदीरातलं 300 किलो सोनं गायब झालं. ते कुणी केलं? आता अयोध्या आणि तिरुपतीच्या मंदीरावरही यांचा डोळा आहे.तुम्ही जे काही करत आहात ते योग्य नाही असं ही सावंत म्हणाले. महाराष्ट्रात सोगात ये मोदी चल रहा है. पण हेच मोदी काय म्हणाले होते, तुमचं मंगळसुत्र काढून घेतलं जाईल. बटेंगे तो कटेंगे कोण म्हणालं होतं. आता त्यांच्या बाबतच प्रेम निर्माण झालं आहे. हे का झालं आहे. तर बिहारच्या निवडणूका जवळ आल्या आहेत, असा टोला सावंत यांनी लगावला. बटेंगे तो कटेंगे, वाले बाटो गे तो बचोगे करत आहेत, असं ही ते म्हणाले.

ट्रेंडिंग बातमी - Waqf Bill : वक्फ विधेयकाची गरज का आहे? लोकसभेत केंद्र सरकारनं सांगितली 5 महत्त्वाची कारणं

देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी काही केलं नाही, ते आज देश चालवत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुस्लीमांनीही बलिदान दिलं आहे. ते ही जेलमध्ये गेले आहेत. वक्फ बोर्डात आता लोक निवडून जाणार नाहीत. तर त्यांना सरकार नियुक्त करणार आहे. इथचं लोकशाहीवर घाला घातला जात आहे. बोर्डात दोन गैर मुस्लीम ही असणार आहेत. हे तुम्ही का करत आहात असा प्रश्नही त्यांनी या निमित्ताने केला. तुमच्या मनात नेमकं काय आहे? पुढे तुम्ही हिंदू मंदीरांच्या देवस्थान समित्यांमध्ये ही गैर हिंदू घेणार आहात का? असा खडा सवाल सावंत यांनी केला. हिंदू मंदीर समित्यांमध्ये तुम्ही जर गैर हिंदू आणणार असाल, तर खबरदार त्याला शिवसेना विरोध करेल असंही सावंत यांनी ठणकावले. हा पायंडा पडणार असेल तर पुढे शिख आणि ख्रिश्चन या धर्मातही तुम्ही हस्तक्षेप करणार आहात का असा सवाल त्यांनी केला. 

ट्रेंडिंग बातमी - Live Update : सुधारणेमुळे मुस्लिमांमधील मागासवर्गाला संधी मिळत असेल तर विरोधकांना अडचण काय आहे? - रविशंकर प्रसाद

काश्मीरमधील 370 कलम हटवलं गेलं आहे. त्यानंतर किती हिंदू कश्मीरमध्ये परतले आहेत. तिथल्या जमीनी कोण खरेदी करत आहेत? देवस्थानच्या जमीनीही विकल्या जात आहेत. त्या कुणाला विकल्या जात आहेत. ते रोखण्यासाठी काही कायदा आणणार आहात का असा प्रश्नही यावेळी सावंत यांनी करत सरकारच्या वर्मावरच बोट ठेवले. या विधेयकावरून तुमचा हेतू स्पष्ट नाही. यातून तुम्हाला केवळ जमीन हडप करायची आहे. तुम्ही कुणालाही यातून न्याय देत नाहीत. तुमच्याकडे सत्य नाही. त्यामुळेच म्हणावे लागेल राम तेरी गंगा मैली हो गयी पापीयों के पाप धोते धोते, असं म्हणत त्यांनी सरकारवर हल्ला चढवला. विशेष म्हणजे त्यांनी या विधेयकाला विरोध करत आहे की पाठींबा देत आहे हे मात्र भाषणात कुठेही सांगितलं नाही.