मंत्रीमंडळाचा विस्तार होत आहे. या विस्तारात कोणाला संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याची चर्चा सुरू होती. त्यात सर्वांचे लक्ष लागले होते ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे. एकनाथ शिंदे मंत्री म्हणून कोणाला संधी देणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. शिवसेनेच्या पदरात 11 मंत्रिपदं पडली आहेत. मात्र यात गेल्या मंत्रिमंडळातील 3 मंत्र्यांचा मात्र पत्ता कट करण्यात आला आहे. त्यात तानाजी सावंत, दीपक केसरकर, आणि अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे. हे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जात होते. तरी त्यांना का डच्चू देण्यात आला याची कारणं आता समोर आली आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्ता या तिन्ही मंत्र्यांना मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी भाजपचाच विरोध होता. सुत्रांच्या माहिती नुसार भाजपने या मंत्र्यांना वगळण्याचा सल्ला एकनाथ शिंदे यांना दिला होता. हे तिन्ही मंत्री कोणत्या ना कोणत्या कारणाने वादग्रस्त राहीले आहेत. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळाचा चेहरा हा स्वच्छ असावा हा भाजपचा आग्रह होता. भाजपच्या निकषात हे नेते बसत नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचाही नाईलाज झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच शेवटी या तीन नेत्यांना परत संधी देण्याचे शिंदे यांनी नाकारले आहे.
ट्रेंडिंग बातमी - सरपंच ते एकनाथ शिंदेंचे विश्वासू! कसा राहिलाय भरत गोगावलेंचा प्रवास?
तानाजी सावंत हे वादग्रस्त वक्तव्या मुळे नेहमीच चर्चेत राहीले आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे महायुतीची अनेक वेळा कोंडी झाली होती. आरोग्य मंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. मराठा आरक्षणाबाबतही त्यांनी उलटसुलट वक्तव्य केली होती. शिवाय विधानसभा निवडणुकीत सावतं हे स्वत: अल्प मतांनी निवडून आले आहेत. शिवाय त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना ही मदत केली नाही असा त्यांच्यावर आक्षेप आहे. ही कारण त्यांना भोवली आहेत. त्यामुळेच त्यांना वगळण्यात आलं असल्याचं आता बोललं जात आहे.
दीपक केसरकर यांच्याकडे शिक्षण खातं होतं. पण त्यांची कामगिरीही निराशजनक राहिली आहे. त्याकडून जी अपेक्षा होती ती ते पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नावापुढे पुली मारण्यात आली आहे. त्याच बरोबर भाजपनेही त्यांच्या नावाला विरोध केला होता. सिंधुदुर्गातून भाजप निलेश राणे यांना संधी देणार आहे. त्यामुळे एकाच जिल्ह्यातील दोन मंत्री नको असाही मतप्रवाह होता. त्यामुळे केसरकर यांचा पत्ता कट झाला आहे. तर अब्दुल सत्तार यांनी महायुती विरोधात केलेलं काम त्यांना भोवलं आहे. त्यामुळे त्यांना भाजपकडून तिव्र विरोध होता. शिवाय त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहे. अशा स्थिती त्यांच्या समावेशाला हिरवा कंदील मिळू शकला नाही.
ट्रेंडिंग बातमी - वडील काँग्रेसकडून 5 वेळा आमदार, आता लेकीला मंत्रिपद; कोण आहेत मेघना बोर्डीकर?
एकीकडे या मंत्र्यांबाबत नाराजी ही होतीच. शिवाय भाजपचाही विरोध होता. पण नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा मानस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता. मागिल मंत्रिमंडळात अनेक नेत्यांना मंत्रिपदाचे आश्वासन शिंदे यांनी दिले होते. पण काही कारणामुळे त्यांना संधी मिळाली नाही. त्यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला होता. तरही ते नाराज झाले नाहीत. ते एकनाथ शिंदें बरोबर राहीले. त्याचे बक्षिस आता त्यांना मिळत आहे. त्यात भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक यांचा समावेश होता. आता शेवटी या सर्वांना संधी मिळणार आहे.