जाहिरात

शिवसेना सत्तेत, पण मुंबईच्या एकालाही मंत्रिपदाची संधी का नाही?

शिवसेना ज्या ज्या वेळी सत्तेत आली त्या त्या वेळी मुंबईच्या पदरात मंत्रिपदं देण्यात आली.

शिवसेना सत्तेत, पण मुंबईच्या एकालाही मंत्रिपदाची संधी का नाही?
मुंबई:

महायुती सरकारचा बहुचर्चीत मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. या विस्तारा मुंबईच्या वाट्याला सर्वात कमी म्हणजे दोन मंत्रिपदं आली आहेत. ती पण भाजपनं आपल्या कोट्यातून दिली आहेत. विशेष म्हणजे मुंबई आणि शिवसेनेचे एक अतुट नाते आहे. असं असताना शिवसेनेचा एकही आमदार या मंत्रिमंडळात नाही. शिवसेना ज्या ज्या वेळी सत्तेत आली त्या त्या वेळी मुंबईच्या पदरात मंत्रिपदं देण्यात आली. पण या वेळी मुंबईचा शिवसेनेचा एकही आमदार राज्याच्या मंत्रिमंडळात नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असतान कोणालाही संधी का दिली नाही याची चर्चा आता सुरू झाली आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबईमध्ये 36 विधानसभा मतदार संघ आहे. 36 आमदार मुंबईतून निवडून येतात. मुंबई हा शिवसेनेचा गड राहीला आहे. शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार हे मुंबईतून निवडून आले आहेत. शिवसेनेत फुट पडल्यानंतर ही दोन्ही गटाच्या पदरात मुंबईने आमदार टाकले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे सहा आमदार निवडून आले आहेत. तर ठाकरेंचे 10 आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळे दोन्ही शिवसेना मिळून 16 आमदार आहेत. अशा वेळी शिवसेना शिंदे गट हा सत्तेत सहभागी झाला आहे. पक्षाचे नेते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत. पण त्यांनी मुंबईतल्या एकाही आमदाराला मंत्रिपदाची संधी दिलेली नाही. 

ट्रेंडिंग बातमी - प्रादेशिक समतोल ते नव्या चेहऱ्यांना संधी! महायुतीच्या कॅबिनेटची 'ही' आहेत 10 वैशिष्ट्ये

मुंबईतून मागाठाणे मतदार संघातून प्रकाश सुर्वे, मुरजी पटेल अंधेरी, अशोक पाटील भांडूप, दिलीप लांडे चांदीवली, मंगेश कुडाळकर कुर्ला, आणि तुकाराम काते चेंबुर  हे सहा आमदार शिंदे गटाचे निवडून आले आहेत. या पैकी प्रकाश सुर्वे किंवा मंगेश कुडाळकर यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. शिवाय मुंबई महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता मंत्रिपदाची आस शिंदेंच्या शिवसेनेतील मुंबईच्या आमदारांना होती. पण तसं काही झालं नाही.

ट्रेंडिंग बातमी - सरपंच ते एकनाथ शिंदेंचे विश्वासू! कसा राहिलाय भरत गोगावलेंचा प्रवास?

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,सुभाष देसाई, अनिल परब,आदित्य ठाकरे,हे शिवसेनेचे मंत्री होते. हे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. पण त्यांच्याही मंत्रिमंडळात त्यांनी शिवसेनेच्या मुंबईतल्या एकाही आमदाराला संधी दिली नाही. आता पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आहेत. या मंत्रिमंडळातही शिंदे यांनी मुंबईला संधी दिली नसल्याचे समोर आले आहे. त्या तुलनेत भाजपने दोघांना संधी दिली आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  आमदारकीचा चौकर अन् आता मंत्री; कोण आहेत मंत्रिपदाची शपथ घेणारे शिंदेंचे विश्वासू संजय शिरसाट?

मुंबईत तसे पाहिले तर ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आहे. त्या तुलनेत शिंदेंची ताकद कमी आहे. अशा वेळी मुंबई महापालिका ठाकरेंच्या हातून हिसकावून घेण्यासाठी शिंदे कोणाला तरी मुंबईत ताकद देतील अशी अपेक्षा होता. मुंबईच्या तुलनेत शिंदेंनी ठाण्यात संधी दिली आहे. त्यांनी प्रताप सरनाईक यांना कॅबिनेट मंत्री केले आहे. शिंदेंनी असं का केलं अशी चर्चा आता राजकीय वर्तूळात सुरू आहे. मुंबई ही शिवसेनेचा गड राहीला आहे. त्यामुळे युतीच्या पहिल्या सरकारमध्येही मंत्रिमंडळात मुंबईचा दबदबा होता. फडणवीसांच्या पहिल्या मंत्रिमंडळातही शिवसेना होती. त्यातही मुंबईच्या आमदारांना मंत्री म्हणून शिवसेनेनं संधी दिली होती. पण शिंदेंच्या काळात कोणालाच संधी मिळाली नाही. त्यामुळे सर्वच जण आश्चर्य वक्त करत आहेत.   

Listen to the latest songs, only on JioSaavn.com