जाहिरात
This Article is From Mar 19, 2024

हॉटेलमध्ये घुसून मालकावर गोळीबार, 4 महिन्यांपू्र्वीचा कृत्याचा घेतला बदला

पुणे जिल्ह्यात हॉटेलमध्ये हल्ला झाल्याची ही काही दिवसांमधील दुसरी घटना आहे.

हॉटेलमध्ये घुसून मालकावर गोळीबार, 4 महिन्यांपू्र्वीचा कृत्याचा घेतला बदला
हॉटेल मालकावर तीन जणांनी गोळीबार केला (प्रतिकात्मक फोटो)
पुणे:

पुण्यातील चाकण परिसरात हॉटेलमध्ये घुसून मालकावर बेधुंद गोळीबार करण्यात आलाय. चाकण परिसरातील रासेमध्ये 'मराठा' हॉटेलचे मालक स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने शिंदे या हल्ल्यात बचावले.  सोमवारी (18 मार्च) रोजी रात्री 10.30 च्या सुमारास ही घटना घडली. 

पुणे जिल्ह्यात हॉटेलमध्ये हल्ला झाल्याची ही काही दिवसांमधील दुसरी घटना आहे. यापूर्वी इंदापूरमध्ये हॉटेलमध्ये बसलेल्या एका व्यक्तीची गोळ्या झाडून तसंच कोयत्यानं वार करुन हत्या करण्यात आली होती. त्याच पॅटर्नची पुनरावृत्ती चाकण परिसरात करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील शिंदेच्या मालकीचे हे मराठा हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये रात्री साडेदहाच्या सुमारास तीन जण आले आणि त्यांनी शिंदे यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात शिंदे किरकोळ जखमी झाले. या प्रकरणात राहुल पवार, अजय गायकवाड आणि अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील अजय गायकवाडला अटक करण्यात आली असून अन्य दोघांचा तपास सुरु आहे.

राहुल पवारच्या भावाची चार महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात स्वप्नीलनं मदत केल्याचा संशय आरोपींना होता. त्यामधून हा गोळीबार झाला आहे. स्वप्नील शिंदे देखील सराईत गुन्हेगार असल्याची माहीती चाकण पोलिसांनी दिलीय. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: