जाहिरात

Amol Muzumdar: 'झिरो' आंतरराष्ट्रीय मॅच! तरीही महिला टीमचा 'हीरो' अमोल मुजुमदार कोण आहे?

Who is Amol Muzumdar: शांत आणि संयमी स्वभावाच्या मुजुमदारच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे.

Amol Muzumdar: 'झिरो' आंतरराष्ट्रीय मॅच! तरीही महिला टीमचा 'हीरो' अमोल मुजुमदार कोण आहे?
Who is Amol Muzumdar: अमोलला आंतरराष्ट्रीय क्रिकेट कधी खेळायला मिळालं नाही.
मुंबई:

Who is Amol Muzumdar: ज्या बॅटरला भारतीय संघात खेळण्याची संधी कधी मिळाली नाही, तो आता टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यासाठी सज्ज झाला आहे. आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप 2025 मध्ये भारतीय टीमने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला धूळ चारत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील या टीमच्या यशामध्ये मुख्य प्रशिक्षक (Head Coach) अमोल मुजुमदार याचा मोठा वाटा आहे. शांत आणि संयमी स्वभावाच्या मुजुमदारच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे.

अमोलच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांना आता या प्रशिक्षकाने आपल्या कामातून उत्तर दिले आहे. अमोल मुजुमदार कोण आहे? भारतीय क्रिकेटमधील मोठी नावे नसतानाही तो महिला संघाला इतके मोठे यश कसे मिळवून देत आहे? वाचा, या अनोख्या प्रशिक्षकाची सविस्तर कथा...

भारतीय महिला क्रिकेट टीमने गुरुवारी झालेल्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव करत इतिहास रचला. कॅप्टन हरमनप्रीत कौर (89 रन) आणि जेमिमा रोड्रिग्ज (127* रन) यांच्या दमदार बॅटिंगमुळे भारताने आपल्या वनडे इतिहासातील सर्वात मोठे 'रन' चेस करत निर्णायक सामन्यात जागा पक्की केली. आता फायनलमध्ये भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे, ज्यांनी पहिल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडला 125 रनने पराभूत केले. या विजयानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौर हिने संघाच्या यशाचे श्रेय थेट मुख्य कोच अमोल मुजुमदार याला दिले.

( नक्की वाचा : Jemimah Rodrigues: ऐतिहासिक सेंच्युरीनंतर धाय मोकलून का रडू लागली जेमिमा? विजयानंतर केलं मोठं वक्तव्य, VIDEO )
 

नियुक्तीनंतर वादळ

ऑक्टोबर 2023 मध्ये अमोल मुजुमदारने भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. यापूर्वी संघात अस्थिरता होती आणि नेतृत्वावर तसेच निवड प्रक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मुजुमदारच्या नियुक्तीवरही बरीच टीका झाली, कारण तो भारतासाठी एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळला नव्हता. काही समीक्षकांनी, केवळ याच कारणामुळे त्याच्या क्षमतेवर संशय व्यक्त केला होता.

अमोलला आंतरराष्ट्रीय क्रिकेट कधी खेळायला मिळालं नाही. पण,  फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने दोन दशकांहून अधिक काळ घालवला आहे. त्याने 11,000 हून अधिक रन काढले आहेत आणि तो मुंबई क्रिकेटमधील सर्वात सातत्यपूर्ण आणि आदरणीय बॅटरपैकी एक मानला जातो.

 विचार करण्याची वेगळी पद्धत

भारतीय क्रिकेटमधील काही महान खेळाडूंकडून खेळ शिकल्यानंतर मुजुमदारने आपला अनुभव देशाच्या ज्युनियर टीम्ससोबत शेअर केला. त्याने दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सच्या ज्युनियर टीम्सलाही कोचिंग दिली आहे. अमोल मुजुमदारची फॅन फॉलोइंग कदाचित जास्त नसेल, पण त्याचा दृष्टिकोन अत्यंत स्पष्ट आहे: कोणताही गाजावाजा न करता, शांतपणे आणि सातत्याने टीममध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम तो करत असतो. 

कोणतीही विशेष ओळख किंवा सन्मान नसतानाही कठोर परिश्रम करण्याची किंमत काय असते, हे त्याला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळेच, त्याचे लक्ष केवळ गाजावाजा करण्याच्या ऐवजी ठोस निकाल देण्यावर असते. सध्याच्या वर्ल्ड कपमध्ये त्याच्या या शांत नेतृत्वाची खरी परीक्षा झाली.

( नक्की वाचा : IND vs AUS : जेमिमाच्या सेंच्युरीनं इतिहास घडवला! भारताच्या विजयानंतर एकाच सामन्यात तुटले 'हे' मोठे रेकॉर्ड )
 

दबावातही शांत राहण्याची सवय

या वर्ल्ड कपमधील ग्रुप स्टेजमध्ये भारताला ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी टीमवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. टीमच्या निवडीवर प्रश्न उठले. अमोलच्या शांत स्वभावावर टीका झाली. तो टीमची नौका पैलतीरावर नेईल का? असे प्रश्न विचारण्यात आले. पण, अमोलनं या सर्व टीकेचा ड्रेसिंग रुमवर कोणताही परिणाम होऊ दिला नाही.

ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतर अमोल मुजुमदार म्हणाला, "ड्रेसिंग रूममध्ये फार मोठा संदेश देण्याची गरज नव्हती. आम्ही एकमेकांना सतत सांगत होतो की मॅच व्यवस्थित 'फिनिश' करणे आवश्यक आहे. आम्ही साधारणपणे चांगली सुरुवात करायचो, पण मॅच फिनिश करण्याच्या क्षेत्रात सुधारणा करणे गरजेचे होते. आज आम्ही ते करून दाखवले."

कोचवर कॅप्टनचा पूर्ण विश्वास

कॅप्टन हरमनप्रीत कौरचा तिच्या कोचवर पूर्ण विश्वास आहे. कोचबद्दल बोलताना ती म्हणाली, "ड्रेसिंग रूममध्ये आम्हा सर्वांना कोच अमोल मुजुमदार याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तो जे काही बोलतो, ते मनापासून बोलतो. जर तो कठोर होत असेल, तर ते देखील आमच्या भल्यासाठीच असते."

अमोलच्या कार्यक्षमतेची ही सर्वात मोठी पावती आहे. त्याला खेळाडू म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही.  पण प्रशिक्षक म्हणून तो आता संघाला विश्वविजेतेपदाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी फक्त एक पाऊल दूर आहे.

अमोल मुजुमदारचे फर्स्ट क्लास करियर

फर्स्ट क्लास मॅच: 171

रन: 11,167

सेंच्युरी : 30

हाफ सेंच्युरी: 60

लिस्ट-A क्रिकेट

मॅच - 113
रन्स - 3286
सेंच्युरी - 3
हाफ सेंच्युरी - 26

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com