जाहिरात

IND vs AUS : 'तूझं काम कर', यशस्वी जैस्वालनं Sam Konstas ला फटकारले, स्मिथलाही सोडलं नाही, Video

India vs Australia : मेलबर्न टेस्टमध्ये पहिल्या दिवसापासून एका खेळाडूची चर्चा होती.

IND vs AUS : 'तूझं काम कर', यशस्वी जैस्वालनं Sam Konstas ला फटकारले, स्मिथलाही सोडलं नाही, Video
Yashasvi Jaiswal
मुंबई:

India vs Australia : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्नमध्ये झालेली टेस्ट ऑस्ट्रेलियानं जिंकलीय. या विजयासह यजमान टीमनं मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या टेस्टमध्ये पहिल्या दिवसापासून एका खेळाडूची चर्चा होती. त्याला ऑस्ट्रेलियन टीममध्ये वयाच्या 19 व्या वर्षीच पदार्पण करण्याची संधी मिळाली. तो खेळाडू आहे, सॅम कोन्स्टास.  सॅम या टेस्टमध्ये त्याच्या बॅटिंगसह भारतीय खेळाडूंशी वाद घातल्यानंही चर्चेत आला. पाचव्या दिवशी देखील सॅमचा हा प्रकार सुरु होता. त्यानं यशस्वी जैस्वालला त्रास देण्याचा प्रयत्न केला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नेमकं काय घडलं?

यशस्वी पाचव्या दिवशी  टीम इंडियाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करत होता. त्यावेळी सिली पॉईंटला उभा असलेला सॅम कोन्स्टास त्याला सतत त्रास देत होताा. त्यावेळी यशस्वीनं त्याला फटकारलं. यावेळी त्यानं ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टिव्ह स्मिथला देखील सोडलं नाही. 

ऑस्ट्रेलियन स्पिन नॅथन लियॉन बॉलिंग टाकत असताना प्रकार घडला. त्या ओव्हरमध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज होत असलेल्या यशस्वीला सॅम काहीतरी म्हणाला. त्यावर यशस्वीनं त्याला 'तुझं काम कर', असं त्यानं सुनावलं. यशस्वीचं बोलणं ऐकून पहिल्या स्लिपमध्ये उभा असलेला स्मिथ पुढे आला. त्यावेळी सॅम कोन्स्टास 'काय बोलत आहे?' असा प्रश्न यशस्वीनं स्मिथला विचारला. 

त्यानंतर सॅम थांबला नाही. त्याच्या उचापाती सुरुच होत्या. पण, पुढच्याच बॉलवर यशस्वीनं एक दमदार ड्राईव्ह लगावला. जो सॅमच्या पायाला लागला. त्यावेळी सॅमनं त्याचा त्रास दाखवला नाही.

यशस्वीच्या विकेटनं वाद

टीम इंडियाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये टॉप ऑर्डर पुन्हा कोसळली. त्यावेळी यशस्वीनं एक बाजू लावून धरत प्रतिकार केला. पण, त्याच्या विकेटवेळी मैदानात चांगलंच नाट्य रंगलं. टीम इंडियाच्या इनिंगमधील 71 व्या ओव्हरमध्ये यशस्वी आऊट ढाला. पॅट कमिन्सनं टाकलेला तो बॉल यशस्वीनं फाईन लेगवर खेळण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न फसला आणि बॉल विकेट किपर कॅरीच्या हातात गेला.

( नक्की वाचा : IND vs AUS : ट्रॅव्हिस हेडवर कारवाई होणार? पंतला आऊट केल्यानंतर वादग्रस्त सेलिब्रेशन, काय आहे अर्थ? )

मैदानावरील अंपायरनं यशस्वीला आऊट दिले नाही, त्यानंतर कमिन्सने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. बॉलने यशस्वीच्या बॅटची कड घेतली की नाही हे रिप्लेमध्ये स्पष्ट झाले नाही. त्यानंतर स्निको मीटरने त्याची तपासणी केली असता स्निको मीटरमध्ये कोणताही स्पर्श दिसून आला नाही. असे असतानाही थर्ड अंपायरनं मैदानातील अंपायरचा निर्णय घेऊन यशस्वीला आऊट घोषित केलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: