जाहिरात

Champions Trophy: पाकिस्तानची चिंधीगिरी सुरुच; गद्दाफी स्टेडियममध्ये काय घडलं? VIDEO पाहून तुमचाही संताप होईल

No Indian Flag in Pakistan: भारतीय टीम दुबईत दाखलही झाली आहे. रविवारी भारतीय खेळाडूंनी तिथे सरावही केला. तर दुसरीकडे लाहोर येथील गद्दाफी स्टेडियममध्ये पाकिस्तानकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचा उद्घाटन सोहळा पार पडला.

Champions Trophy: पाकिस्तानची चिंधीगिरी सुरुच; गद्दाफी स्टेडियममध्ये काय घडलं? VIDEO पाहून तुमचाही संताप होईल
Champions Trophy

No Indian flag in Gaddafi Stadium: टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाण्याची केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली नाही. त्यामुळे आयसीसीच्या या स्पर्धेचं दोन देशांमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. आयसीसीच्या नव्या हायब्रिड मॉडेलनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताचे सर्व सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. तर इतर संघ आपले सामने पाकिस्तानात खेळणार आहे. 

भारतीय टीम दुबईत दाखलही झाली आहे. रविवारी भारतीय खेळाडूंनी तिथे सरावही केला. तर दुसरीकडे लाहोर येथील गद्दाफी स्टेडियममध्ये पाकिस्तानकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचा उद्घाटन सोहळा पार पडला.  याठिकाणी पाकिस्तानने नेहमीप्रमाणे कुरघोड्या करत भारताला डिवचलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. 

झालं असं की, गद्दाफी स्टेडियममध्ये सात संघांचे राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आले होते. यामध्ये भारताचा तिरंगा नव्हता. पाकिस्तानसह या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचा झेंडा देखील तेथे फकवणे गरजेचं होतं. मात्र पाकिस्तान हलकटपणाने संपूर्ण भारतीयांनी संताप व्यक्त केला आहे. 

बीबीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवलं नाही याला प्रत्युत्तर दिल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. पाकिस्तानचा फॅन असलेल्या नवाज नावाच्या युजरने X वर लिहिले की, "कराचीमध्ये भारतीय ध्वज नाही. फक्त भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये सुरक्षेचा सामना करावा लागला आणि त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला. त्यामुळे पीसीबीने कराचीच्या स्टेडियममधून भारतीय ध्वज हटवला, तर इतर देशांचे झेंडे ठेवले." 

पीसीबीने हा व्हिडीओ रिलीज केल्यानंतर भारतीय फॅन्स पाकिस्तानवर तुटून पडले आहेत. पाकिस्तान मुद्दाम असं केल्याचा आरोप केला जात आहे. पाकिस्तानात तब्बल 8 वर्षांनी आयसीसीची मोठी स्पर्धा खेळवली जात आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: