भारताचा स्टार फलंदाज म्हणून ओळख असलेल्या अजिंक्य रहाणे याने दक्षिण सोलापुरातील वडापूर या गावातील अंगणवाडी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना भेट दिली आहे. याचे व्हिडिओदेखील समोर आले आहेत. विशेष म्हणजे अजिंक्यने अंगणवाडीत तयार होणाऱ्या खिचडीची चव चाखत चिमुकल्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.
अर्थ फिट या सामाजिक संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेले विविध उपक्रम पाहण्यासाठी अजिंक्य रहाणे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहे. यावेळी रहाणे याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर या ठिकाणी विविध गावांना भेटी दिल्या. गाव फिरताना तो जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाडी तसेच इतर ग्रामपंचायत या ठिकाणी भेटी दिल्या आणि पाहणी केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अंगणवाडीतील चिमुकल्या विद्यार्थी तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. रहाणे पोहोचला तेव्हा अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी खिचडी तयार केली जात होती. त्यामुळे रहाणे तिथल्या स्वयंपाकघरात पोहोचला आणि खिचडीची चव चाखली. यानंतर तो बराच वेळ विद्यार्थ्यांच्या घोळक्यात बसला आणि चिमुरड्यांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world