जाहिरात

Divya Deshmukh : नागपूरकर दिव्या बनली वर्ल्ड चेस चॅम्पियन! 19 व्या वर्षीच रचला इतिहास

Women's Chess World Cup Final: नागपूरकर दिव्या देशमुखनं बुद्धीबळाच्या खेळात इतिहास घडलला आहे. 19 वर्षांची दिव्या वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे.

Divya Deshmukh : नागपूरकर दिव्या बनली वर्ल्ड चेस चॅम्पियन! 19 व्या वर्षीच रचला इतिहास
Divya Deshmukh : दिव्या देशमुखनं दुप्पट वयाच्या कोनुरु हम्पीला पराभूत केले.
मुंबई:

Women's Chess World Cup Final: नागपूरकर दिव्या देशमुखनं बुद्धीबळाच्या खेळात इतिहास घडलला आहे. 19 वर्षांची दिव्या वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे. जॉर्जियाच्या बाटुमी येथे खेळल्या गेलेल्या FIDE वर्ल्ड कप 2025 मध्ये अखेर दिव्या देशमुखने बाजी मारली. , दिव्या देशमुखने अनुभवी कोनेरू हम्पीला 15-मिनिटांच्या दुसऱ्या रॅपिड टाय-ब्रेकरमध्ये हरवले. शनिवार आणि रविवारी झालेल्या क्लासिकल सामन्यांमध्ये ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने बुद्धिबळाची नवीन स्टार दिव्या देशमुखला आघाडी मिळवू दिली नाही. क्लासिकल सामना 1-1 पॉईंट्सनं बरोबरीत राहिला होता.

सोमवारी खेळल्या गेलेल्या रॅपिड राऊंडमध्ये नागपूरची 18 वी वर्ल्ड रँकिंग असलेली दिव्या देशमुखने पांढऱ्या मोहऱ्यांनी सुरुवात केली. ती आक्रमकही दिसली. पण 5 वी वर्ल्ड रँकिंग असलेली हम्पीने काळ्या मोहऱ्यांनी खेळताना सामना बरोबरीत सोडवला आणि मानसिक आघाडी मिळवली. 

( नक्की वाचा : Divya Deshmukh : नागपूरची मुलगी कशी बनली वर्ल्ड चेस चॅम्पियन? थक्क करणारा आहे सर्व प्रवास )
 

रॅपिड राऊंडच्या दुसऱ्या गेममध्ये काळ्या मोहऱ्यांनी खेळणारी दिव्या देशमुख सुरुवातीपासूनच प्रभावी होती. तर, तज्ञांच्या मते सुरुवातीला कोनेरूला टाइम मॅनेजमेंट थोडे कठीण वाटले आणि रॅपिड राऊंडच्या दुसऱ्या गेममध्ये तिच्याकडून एक 'ब्लंडर' (मोठी चूक) देखील झाली.

( नक्की वाचा : IND vs ENG : हॅरी ब्रुकला बॉलिंग देण्याचा रडीचा डाव का खेळला? बेन स्टोक्सनं सांगितलं कारण )
 

बुद्धिबळ तज्ञांनुसार दिव्या उत्तम तयारीसह आली होती. NDTV शी खास बोलताना 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन आणि 2 वेळा FIDE वर्ल्ड कप विजेता विश्वनाथन आनंदने सामन्यापूर्वी सांगितले, "कोनेरू हम्पी खूप मजबूत आहे, पण सध्या मोमेंटम थोडे दिव्याच्या बाजूने दिसत आहे."

चीनला मागे टाकून भारत बनला चॅम्पियन

या स्पर्धेतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही भारतीय खेळाडूंनी 'चायनीज वॉल' तोडून फायनलमध्ये प्रवेश केला होता. FIDE वर्ल्ड कपच्या नॉकआउट टूर्नामेंटच्या फायनलपर्यंत पोहोचण्यासाठी 38 वर्षीय कोनेरू हम्पी आणि 19 वर्षीय दिव्या देशमुखने अनेक चीनी खेळाडूंना हरवले. महिला गटात टॉप 100 मध्ये चीन अव्वल स्थानी आहे. चीनचे 14 खेळाडूंच्या तुलनेत भारताचे 9 खेळाडू टॉप 100 मध्ये सामील आहेत. पण FIDE वर्ल्ड कपमध्ये कोनेरू आणि दिव्याने चीनच्या मजबूत खेळाडूंना मात देऊन भारताचे वर्चस्व सिद्ध केले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com