
Divya Deshmukh Won : भारताच्या आघाडीच्या खेळाडूंपैकी एक म्हणून उदयास आलेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर आणि मूळची नागपुरची असलेली दिव्या देशमुखने तिचा उच्च दर्जाची हमवतन डी हरिका हिला टाय-ब्रेकमध्ये 2-0 हरवलं आहे. दिव्याने FIDE च्या जागतिक महिला बुद्धिबळ कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. क्लासिकल चेस दोन वेळा रद्द झाल्यानंतर रॅपिड टायब्रेकमध्ये हरिकावर प्रेशर होतं. मात्र दिव्याने पहिला गेम दृढनिश्चयाने जिंकला.
यानंतर दिव्या दुसरी बाजीही जिंकली. हरिका तीन वेगवेगळ्या वेळी जागतिक महिला अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचली आहे. आधी हम्पी आणि आता दिव्या या दोन भारतीय खेळाडू आहेत ज्यांनी महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ही स्पर्धा नव्या जागतिक चॅम्पियनशीपचा भाग आहे. याचा अर्थ आगामी जागतिक महिला अजिंक्यपद स्पर्धेत एका भारतीयाचा प्रवेश निश्चित झाला आहे.
नक्की वाचा - Vinod Kambli: 'विनोद कांबळीला कधीच पैशांची पर्वा नव्हती, त्यानं ती ऑफरही फेटाळली' माजी सहकाऱ्याचा गौप्यस्फोट
महिलांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चीनच्या जू वेनजुनशी कोण सामना करेल हे आता निश्चित झालं आहे. दशकभराहून अधिक काळ सर्वोच्च क्रमांकावर असलेली भारतीय खेळाडू कोनेरू हम्पी तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच अंतिम चारमध्ये पोहोचली आहे. दिव्याचं त्यांच्यासोबत सेमीफायनलिस्टच्या रुपात जोडलं जाणं भारतीय महिला बुद्धीबळात एका मोठा बदल म्हणन दिसत आहे.
नक्की वाचा - Who is divya deshmukh : पंतप्रधान मोदींनीही केलं कौतुक, नागपुरची ग्रँडमास्टर दिव्या देशमुख कोण आहे?
♟ FIDE Women's World Cup Round 5 tiebreaks: 🇮🇳 Divya Deshmukh stuns 🇮🇳 Harika Dronavalli to reach semifinals
— International Chess Federation (@FIDE_chess) July 21, 2025
Divya Deshmukh, the young IM from Nagpur, Maharashtra, continued her remarkable rise in the world of chess with a stunning victory over GM Harika Dronavalli in Batumi.… pic.twitter.com/PD0aA0Swtt
सेमीफायनलमध्ये पोहोचल्यानंतर दिव्या भावुक...
दिव्या देशमुख हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिव्या हमवतनची डी हरिका हिला टायब्रेकमध्ये हरवल्यानंतर रडताना दिसली.तिच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world