जाहिरात

Kedar Jadhav : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू राजकीय इनिंग सुरू करण्याच्या तयारीत, आज पक्षप्रवेश होणार

आजवर क्रिकेटचं मैदान गाजवलेला केदार जाधव राजकीय आखड्यात प्रवेश करणार असण्याची माहिती आहे.

Kedar Jadhav : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू राजकीय इनिंग सुरू करण्याच्या तयारीत, आज पक्षप्रवेश होणार

Kedar Jadhav News : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव लवकरच राजकीय इनिंग सुरु करण्याची शक्यता आहे. आजवर क्रिकेटचं मैदान गाजवलेला केदार राजकीय आखड्यात प्रवेश करणार असण्याची माहिती आहे. केदार जाधव भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये केदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज मंगळवारी मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात केदार जाधव भाजपाच प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची शक्यता आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वयाच्या 39 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती...

2024 मध्ये टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर केदार जाधव याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी त्याने क्रिकेटला गुडबाय केलं होतं. त्याच्या या निर्णयानंतर चाहत्यांनी निराशा व्यक्त केली होती. केदार जाधवने 2014 मध्ये श्रीलंकेविरोधातील सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये  सुरुवात केली होती.

Political News : राज ठाकरेंसोबत तासभर काय चर्चा झाली? उदय सामंतांनी सविस्तर सांगितलं

नक्की वाचा - Political News : राज ठाकरेंसोबत तासभर काय चर्चा झाली? उदय सामंतांनी सविस्तर सांगितलं

केदारच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे...

केदार जाधव भारतासाठी 73 वनडे मॅच खेळला. ज्यामध्ये त्याने 42.09 च्या सरासरीने 1389 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 101.60 होता. केदार जाधवने वनडे इंटरनॅशनलमध्ये दोन शतक आणि 6 अर्धशकत ठोकले. केदारने वनडे इंटरनॅशनलमध्ये 27 विकेट घेतले. केदारने 2015 मध्ये झिम्बॉम्ब्वे विरोधातील सामन्यात टी20 इंटरनॅशनलच्या करिअरची सुरुवात केली होती. एकूण 9 टी20 इंटरनॅशनल सामन्यात केदार जाधवने 20.33 च्या सरासरीने 122 धावा काढल्या होत्या.    

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: