CSK CEO on MS Dhoni IPL Future and Sanju Samson Trade: आयपीएल (IPL) 2026 च्या आधी चेन्नई सुपर किंग्स (CSK) च्या चाहत्यांसाठी एकाच वेळी आनंदाची आणि काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. एका बाजूला, CSK चे सीईओ काशी विश्वनाथन यांनी स्पष्ट केले आहे की, महान क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनी हे पुढील वर्षी, म्हणजेच 2026 च्या आयपीएलमध्ये निश्चितपणे खेळण्यासाठी सज्ज आहेत. पण दुसऱ्या बाजूला, राजस्थान रॉयल्स (RR) चा कॅप्टन संजू सॅमसन याला संघात घेण्यासाठी CSK जोरदार प्रयत्न करत असून, त्यासाठी धोनीचा सर्वात जुना आणि विश्वासू सहकारी असलेल्या रवींद्र जडेजा ला 'ट्रेड' (Trade) करण्याचा पर्याय विचारात घेतला जात असल्याची धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे.
धोनीचं ठरलं
महेंद्र सिंह धोनी 2008 मध्ये आयपीएलची सुरुवात झाल्यापासून CSK चा आधारस्तंभ राहिला आहे. CSK साठी 5 वेळा विजेतेपद जिंकून देणाऱ्या या दिग्गज बॅटरने 2025 च्या आयपीएलमध्ये नेतृत्वाची धुरा पुन्हा एकदा सांभाळली होती. सुरुवातीला सलामी बॅटर रुतुराज गायकवाड याला कॅप्टन बनवले होते, पण कोपरच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर धोनीनं पुन्हा नेतृत्त्व स्वीकारलं. CSK चे सीईओ काशी विश्वनाथन यांनी शुक्रवारी IANS शी बोलताना स्पष्ट केले की, धोनी पुढील आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, "त्याच्या खेळण्याची शक्यता आहे, ही (सध्याची) स्थिती आहे. आम्हाला वाटतं की तो आगामी आयपीएलमध्ये खेळेल."
( नक्की वाचा : IND vs SA : दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सीरिजसाठी पंतचे पुनरागमन, 'या' खेळाडूंचा पत्ता कट! )
संजू सॅमसनच्या ट्रेडमुळे चर्चांना उधाण
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, संजू सॅमसनच्या संभाव्य ट्रेडबद्दल चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे, ज्यामुळे CSK च्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, जर या ट्रेडमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा एखादा महत्त्वाचा बॅटर किंवा बॉलर सामील झाला, तर त्यात आश्चर्य वाटायला नको.
एका मीडिया रिपोर्टमध्ये तर थेट हा दावा केला जातोय की, संजूला संघात घेण्यासाठी CSK रवींद्र जडेजा ला संभाव्य व्यापार विकल्प म्हणून पाहतोय. जर ही चर्चा खरी ठरली, तर धोनी आपल्या आयपीएलमधील सर्वात जुन्या आणि जवळच्या साथीदारापासून वेगळा होईल, जी CSK फॅन्ससाठी निश्चितच मोठी भावनिक बाब असेल.
ट्रेडची अंतिम मुदत आणि सीईओचं स्पष्टीकरण
आयपीएलमध्ये खेळाडूंना रिटेन करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर आहे. त्यामुळे, क्रिकेट जगताचे लक्ष कोणत्या मोठ्या नावाचा ट्रेड होतो याकडे लागले आहे. जुलै महिन्यापासून, विकेटकीपर-बॅटर आणि राजस्थान रॉयल्स (RR) चा कॅप्टन असलेल्या संजू सॅमसनला CSK किंवा दिल्ली कॅपिटल्स (DC) मध्ये ट्रेड केले जाण्याची जोरदार चर्चा होती.
( नक्की वाचा : EXCLUSIVE: 'खाण्यासाठी पैसे नव्हते', वर्ल्ड चॅम्पियन Kranti Goud ने NDTV ला सांगितली संघर्षाची कहाणी )
IANS ने जेव्हा सीईओ काशी विश्वनाथन यांना RR कडून सॅमसनला ट्रेड करण्याची कोणतीही शक्यता आहे का, असे विचारले, तेव्हा त्याचे उत्तर नकारात्मक होते. तो म्हणाला, "नाही, शक्यता नाही, शक्यता नाही." मात्र, ट्रेडच्या कोणत्याही घडामोडींवर अधिक स्पष्टता येत्या काही दिवसांत मिळू शकते, असे वृत्त आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world