आवडीचे पदार्थ सोडले, 16 किलो वजन कमी केलं...त्यानंतर ऋषभ पंतला मिळालं वर्ल्ड कपचं तिकीट

Rishabh Pant : आवडीचे पदार्थ सोडण्यापासून ते रात्री लवकर झोपण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचं पंतनं काटेकोर पालन केलंय.

जाहिरात
Read Time: 2 mins
ऋषभ पंतची T20 वर्ल्ड कप 2024 साठी टीम इंडियात निवड झालीय.
मुंबई:

दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंतचं (Rishabh Pant) दमदार कमबॅक ही या आयपीएल सिझनमधील (IPL 2024) एक मोठी घटना आहे. पंतची आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर T20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीममध्ये निवड झालीय. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत जून महिन्यात ही स्पर्धा होणार आहे. केएल राहुल, इशान किशन, जितेश शर्मा या विकेट किपर-बॅटरना मागं टाकत पंतनं टीममध्ये जागा मिळवलीय.  अर्थात पंतला वर्ल्ड कपचं तिकीट सहज मिळालेलं नाही.  त्यासाठी त्यानं प्रचंड मेहनत घेतलीय. आवडीचे पदार्थ सोडण्यापासून ते रात्री लवकर झोपण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचं पंतनं काटेकोर पालन केलंय. पंतचा हा सिक्रेट डाएट प्लॅन आता समोर आलाय. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

ऋषभ पंतचा डिसेंबर 2022 मध्ये मोठा अपघात झाला होता. या अपघातानंतर तो काही महिने बेडवरच होता. बेडवरुन ते क्रिकेटच्या मैदानावर परतण्याचा प्रवास त्यानं गेल्या 16 महिन्यात पूर्ण केलाय. 'टाईम्स ऑफ इंडिया' मधील वृत्तानुसार ऋषभ पंतनं या काळात कॅलरी फ्री डाएटचं पालन केलं. त्याचबरोबर फ्राईड चिकन, रसमलाई आणि बिर्याणी हे आवडीचे पदार्थ खाणं त्यानं बंद केलं. पण, चिली चिकन सोडणं त्याला जमत नव्हतं. त्याला या चिकनमध्ये फक्त 5 मिली लीटर व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल वापरण्याची परवानगी होती. 

Advertisement

ऋषभ पंतनं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कॅलरी डाएट सुरु केलं. त्याच्या शरिराला रोज 1400 कॅलरीची गरज असेल तर त्याला 1 हजार कॅलरीच दिल्या जात असे. पंत त्या काळामध्ये मॅच फिट होण्यासाठी कठोर मेहनत करत होता. त्याचबरोबर त्याचा जखमी उजवा पाय बरा व्हावा यासाठी देखील व्यायाम सुरु होता, त्यामुळे या डाएटचं पालन करणे त्याच्यासाठी अवघड होतं, अशी माहिती पंतच्या डाएट प्लॅनशी संबंधित सोर्सनी 'टाईम्स ऑफ इंडिया' शी बोलताना सांगितली. 

Advertisement

( नक्की वाचा : टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया जाहीर, रोहितसह 'हे' 15 करणार स्वप्नपूर्ती )
 

पंतला त्याच्या जेवणात वेगळी फ्लेवर हवी होती. त्यामुळे तो बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीत न राहता एका फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला. तो घरात बनवलेले जेवण खात असे. चिली चिकन सोडणं त्याला शक्य नव्हतं. त्यामुळे त्या जास्त ऑईली होणार नाही याची खबरदारी घेण्यात येत होती. गोवन भेंडी हा देखील त्याचा आवडता पदार्थ होता, अशी माहिती या सोर्सनी दिली आहे. 

Advertisement

पंतचे फिटनेस रहस्य सांगणाऱ्या या रिपोर्टनुसार त्यानं गेल्या चार महिन्यात 16 किलो वजन कमी केलंय. त्यासाठी त्यानं काटोकोर डाएटसह रात्री कधी झोपणार? याचं वेळापत्रकही निश्चित केलं होतं.  

पंत रात्री 11 नंतर आय फोन, आय पॅड, टीव्ही यासह कोणतेही वापरत नसे. त्याचबरोबर तो आठ ते नऊ तास सलग झोप घेत असेल. या विश्रांतीनंतर तो सकाळी ट्रेनिंगला जात असे, अशी माहिती सूत्रांनी दिली

Topics mentioned in this article