जाहिरात
This Article is From Apr 30, 2024

T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया जाहीर, रोहितसह 'हे' 15 करणार स्वप्नपूर्ती

वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपससाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे.

T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया जाहीर, रोहितसह 'हे' 15 करणार स्वप्नपूर्ती
T20 WC 2024 : टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई:

वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपससाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या कॅप्टनसीममध्ये खेळणाऱ्या या टीममध्ये कोणताही मोठा बदल करणे बीसीसीआयमं टाळलं आहे. हार्दिक पांड्या टीमचा व्हाईस कॅप्टन आहे. संजू सॅमसन आणि ऋषभ पंत हे दोन विकेट किपर या टीममध्ये आहेत. तर शुभमन गिल आणि केएल राहुल यांना टीममध्ये जागा मिळाली नाही.

शुभमन गिलचा राखीव खेळाडू म्हणून टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. तर अनुभवी फलंदाज आणि लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन केएअल राहुलची निवड झालेली नाही. हार्दिक पांड्यासह शिवम दुबे, रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल हे चार ऑल राऊंडर भारतीय टीममध्ये आहेत.  

फास्ट बॉलर म्हणून जसप्रीत बुमराहसह अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराजची निवड करण्यात आलीय. माजी क्रिकेटपटूंनी मोहम्मद सिराजचा त्यांच्या टीममध्ये समावेश केला नव्हता. पण, तो जागा टिकवण्यात यशस्वी झाला आहे.

( नक्की वाचा : विराट, रोहित नाही तर T20 वर्ल्ड कपमध्ये हा खेळाडू असेल X फॅक्टर, युवराजची भविष्यवाणी )

विराटवर विश्वास कायम 

विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटवर अनेकांनी शंका उपस्थित केली होती. पण, निवड समितीनं त्याच्यावरील विश्वास कायम ठेवलाय. या आयपीएलमध्ये विराटनं 500 रनचा टप्पा पूर्ण केला आहे. आयपीएल 2024 मध्ये त्याचा स्ट्राईक रेट 147.49 आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया :  रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, (व्हाईस कॅप्टन), शिवम दुबे, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह

राखीव खेळाडू :  शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com