जाहिरात

Gautam Gambhir : रोहित शर्मावर प्रश्न विचारणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराची गंभीरनं केली बोलती बंद

Gautam Gambhir on Rohit Sharma Future : 'रोहित शर्माचा सध्याचा फॉर्म पाहता तो आणखी किती काळ क्रिकेट खेळेल? ', असा प्रश्न गंभीरला विचारण्यात आला होता.

Gautam Gambhir : रोहित शर्मावर प्रश्न विचारणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराची गंभीरनं केली बोलती बंद
मुंबई:

Gautam Gambhir on Rohit Sharma Future : भारतीय क्रिकेट टीमनं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मंगळवारी (4 मार्च) रोजी झालेल्या सेमी फायनलमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सनं पराभव केला. आता चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदापासून टीम इंडिया फक्त एक विजय दूर आहे.

भारतीय टीम मैदानात दमदार कामगिरी करतीय. त्याचवेळी मैदानाच्या बाहेर टीमचा कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) भविष्यावर चर्चा सुरु आहे. रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाकडून किती दिवस खेळणार असा प्रश्न? एका पाकिस्तानी पत्रकारानं हेड कोच गौतम गंभीरला (Gautam Gambhir) विचारला. पाकिस्तानी पत्रकाराचा हा प्रश्न ऐकताच गंभीरचा पारा चढला. त्यानं पाकिस्तानी पत्रकाराला चांगलंच सुनावलं.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'रोहित शर्माचा सध्याचा फॉर्म पाहता तो आणखी किती काळ क्रिकेट खेळेल? ', असा प्रश्न गंभीरला विचारण्यात आला होता. त्यावर गंभीर म्हणाला की, 'हे पाहा चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल जवळ येत आहे. मी त्यापूर्वी काय सांगणार? तुमचा कॅप्टन जर या पद्धतीनं बॅटींग करत असेल तर ते ड्रेसिंग रुमसाठी चांगले संकेत आहेत. आम्हाला निर्भिड आणि धाडसी खेळ खेळायचा आहे. तुम्ही रन्सच्या आधारे मुल्यमापन करता आम्ही इम्पॅक्टच्या आधारावर करतो.

तुम्ही आकडेवारीच्या आधारावर मोजता आणि परिणामाच्या आधारवर विचार करतो. एक पत्रकार, एक्स्पर्ट या नात्यानं तुम्ही फक्त नंबर पाहाता. पण, एक कोच म्हणून आम्ही नंबर किंवा सरासरीचा विचार करत नाही. कॅप्टननं स्वत: याबाबत सुरुवात केली तर ड्रेसिंग रुमसाठी यासारखी चांगली गोष्ट कोणती नाही,' असं गंभीरनं या पत्रकाराला सुनावलं. 

IND vs AUS : टीम इंडियाच्या विजयाचा पाकिस्तानला सर्वात जास्त त्रास, लाहोरचं मैदान राहणार रिकामं

( नक्की वाचा :  IND vs AUS : टीम इंडियाच्या विजयाचा पाकिस्तानला सर्वात जास्त त्रास, लाहोरचं मैदान राहणार रिकामं )

रोहित पहिला भारतीय कॅप्टन

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये आणखी एक रेकॉर्ड केला. आजवरच्या क्रिकेट इतिहासात सर्व आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारा तो टीम इंडियाचा पहिला कॅप्टन बनला आहे. सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर रोहितनं हा रेकॉर्ड केला. 

रोहित शर्मा फेब्रुवारी 2022 मध्ये टीम इंडियाचा पूर्णवेळ कॅप्टन बनला. त्यानंतरच्या तीन वर्षांमध्ये त्यानं अनेक रेकॉर्ड्सना गवणी घातली आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं प्रत्येक आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 

रोहितच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 (CC T20 World Cup 2024), आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 ( ICC Cricket World Cup 2023), आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 ( ICC Cricket World Cup 2023) आणि आता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 ( ICC Champions Trophy) स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: