![पाकिस्तानची पुन्हा गेली जगासमोर लाज, घडला भयंकर प्रकार! Champions Trophy कशी होणार? पाहा Video पाकिस्तानची पुन्हा गेली जगासमोर लाज, घडला भयंकर प्रकार! Champions Trophy कशी होणार? पाहा Video](https://c.ndtvimg.com/2025-02/orgq40u_viral-video_625x300_13_February_25.jpg?im=FeatureCrop,algorithm=dnn,width=773,height=435)
Champions Trophy Opening Ceremony Viral Video: पाकिस्तानमध्ये यंदा मोठ्या कालावधीनंतर आयसीसीची स्पर्धा होत आहे. 19 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा पाकिस्तान यजमान आहे. बऱ्याच कालावधीनंतर आयसीसीची स्पर्धा होत असल्यानं उद्घाटनाचे 3 कार्यक्रम ठेवण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) घेतला आहे.
कराचीतील नॅशनल स्टेडियमवर झालेल्या उद्घाटन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमातील खराब व्यवस्थेमुळे पाकिस्तानची जगासमोर लाज गेली आहे. या कार्यक्रमात प्रेक्षकांनी चक्क स्टेडियमच्या भिंतीवरुन उडी मारुन मैदानात प्रवेश केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कराचीतील नॅशनल स्टेडियमला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पूर्णपणे अद्ययावत करण्यात आले आहे. त्यामध्ये नवी LED लाईट्स, डिजिटल स्क्रीन्स तसंच अन्य सुविधा देखील देण्यात आल्या आहेत. पण, 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात मैदानातील सुरक्षा व्यवस्था कमकुवत असल्याचं सिद्ध झालं. यावेळी अनेक प्रेक्षकांनी अवैधपणे स्टेडियममध्ये प्रवेश केला.
The scene of VIP entry during Grand opening ceremony of Champions trophy 2025 in Karachi Pakistan
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 13, 2025
pic.twitter.com/7GPpMxQkyU
PCB चे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी उद्घाटन कार्यक्रम भव्य करण्याची पूर्ण योजना केली होती. पण,स्टेडियममधील गैरव्यवस्थेमुळे PCB आणि स्थानिक प्रशासनावर जोरदार टीका होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या VIP पाहुण्यांसमोर आयोजन समितीची लाज गेली आहे.
( नक्की वाचा : Video : पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे भर मैदानात लाजिरवाणे चाळे, ICC ची तत्काळ कारवाई )
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ही सुरक्षेची मोठी चूक आहे, असं मत एका युझरनं व्यक्त केली आहे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाचं स्थळ कराची बदलून दुबई करावं अशी मागणी अन्य एका युझरनं केला. तर अन्य एका युझरनं भाई लोकांनी स्टेडियम तर घाईघाईनी तयार केलं, पण गडबडीत गेट बनवण्यास विसरले असा टोला लगावला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world