जाहिरात

ICC Rule : फायनलमधला 'सूर्या'चा कॅच आठवतोय ? आता तसं करता येणार नाही, वाचा काय आहे नवा नियम!

ICC New Rule : मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC) ने बाऊंड्री आणि रिले कॅचशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत.

ICC Rule : फायनलमधला 'सूर्या'चा कॅच आठवतोय ? आता तसं करता येणार नाही, वाचा काय आहे नवा नियम!
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवचा हा कॅच अजरामर ठरला आहे.
मुंबई:

ICC New Rule : कोणत्याही क्रिकेटच्या मॅचमध्ये बाऊंड्रीजवळ घेतले जाणाऱ्या कॅचची सर्वाधिक चर्चा होत असते. काही कॅच तर क्रिकेट इतिहासात अजरामर झाले आहेत. T20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलमध्ये सूर्यकुमार यादवनं देखील असाच एक कॅच पकडला होता. सूर्यानं बाऊंड्री लाईनवर डेव्हिड मिलरचा खतरनाक कॅच पकडला. सूर्याच्या त्या कॅचमुळे टीम इंडियाला ट्रॉफी जिंकण्यास खूप मदत झाली. पण आता मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC) ने बाऊंड्री आणि रिले कॅचशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

क्रिकेटच्या नियमांमध्ये मोठे बदल

पूर्वी, खेळाडू चेंडू हवेत असताना बाऊंड्रीच्या बाहेर अनेक वेळा स्पर्श करू शकत होते. फक्त त्यांचा पाय जमिनीवर टेकलेला नसावा, ही अट होती. त्यानंतर ते मैदानामध्ये येऊन कॅच पूर्ण करू शकत होते. पण आता नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत

बिग बॅश लीग 2023-24 च्या एका मॅचमध्ये मायकल नेसरने बाऊंड्रीबाहेर हवेत बॉल दोन वेळा मारून कॅच पकडला होता. त्यावेळी बॅटरला आऊट देण्यात आलं. पण, या निर्णयावर खूप वाद आणि टीका  झाली. त्यानंतरच या नियमांमध्ये बदल करण्याची चर्चा सुरु झाली. 

WTC Final : मार्करामचा पराक्रम, दक्षिण आफ्रिका चॅम्पियन! ऑस्ट्रेलियाला पराभूत करत पटकावले ऐतिहासिक विजेतेपद

( नक्की वाचा :  WTC Final : मार्करामचा पराक्रम, दक्षिण आफ्रिका चॅम्पियन! ऑस्ट्रेलियाला पराभूत करत पटकावले ऐतिहासिक विजेतेपद )

काय आहे बदल?

MCC च्या नवीन नियमांनुसार, आता कोणताही फिल्डर बाऊंड्रीच्या बाहेर बॉलला फक्त एकदाच स्पर्श करू शकणार आहे. कॅच योग्य प्रकारे पूर्ण करण्यासाठी, फिल्डरला कॅच घेण्यापूर्वी मैदानामध्ये यावे लागेल. 

एखाद्या फिल्डरनं पहिल्यांदा मैदानातून बॉल हातळला असेल आणि नंतर थोडा वेळ बाहेर जाऊन पुन्हा मैदानात येऊन कॅच पूर्ण केला तर तो नव्या नियमानुसार वैध आहे. पण, बॉलला स्पर्श करताना फिल्डर मैदानाबाहेर गेला असेल, तर बॉल तेव्हाच वैध मानला जाईल जेव्हा फिल्डर मैदानामध्ये परत येऊन कॅच पूर्ण करेल.

रिले कॅचमध्ये बदल झाला?

रिले कॅचच्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. रिले कॅचमध्ये, जेव्हा एखादा फिल्डर बाहेर जात असतो किंवा त्याचा तोल जात असतो, तेव्हा तो बॉल त्याच्या सहकाऱ्याकडं फेकतो. नवीन नियमानुसार, बॉल फेकणारा खेळाडू बाऊंड्रीच्या आत असला पाहिजे, आणि कॅच घेणारा फिल्डरही कॅच घेताना पूर्णपणे मैदानामध्ये हवा. मदत करणारा फिल्डर बाऊंड्रीबाहेर असेल, तर तो बॉल 'बाउंड्री' मानला जाईल.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com