जाहिरात

IND vs ENG : शर्माजी का बेटा छा गया, 13 बॉलमध्ये काढले 68 रन्स! टीम इंडियाचा इंग्लंडवर सहज विजय

India vs England 1st T20I : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या T20 सामना टीम इंडियानं 7 विकेट्सनं जिंकला आहे

IND vs ENG : शर्माजी का बेटा छा गया, 13 बॉलमध्ये काढले 68 रन्स! टीम इंडियाचा इंग्लंडवर सहज विजय
मुंबई:

India vs England 1st T20I : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या T20 सामना टीम इंडियानं 7 विकेट्सनं जिंकला आहे. इंग्लंडनं दिलेलं 133 रन्सचं आव्हान यजमान टीमनं 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. ओपनर अभिषेक शर्माची (Abhishek Sharma) दमदार खेळी हे भारतीय इनिंगचं वैशिष्ट्य ठरलं.

अभिषेकनं 34 बॉलमध्ये 5 फोर आणि 8 सिक्सच्या मदतीनं 79 रन काढले. अभिषेकनं फक्त 13 बॉलमध्येच 68 रन्स काढत इंग्लंडच्या अनुभवी बॉलर्सना निष्प्रभ ठरवलं. त्यानं 232.25 च्या सरासरीनं रन्स केले.

टीम इंडियाकडून संजू सॅमसननं 26 रन केले. अभिषेक आणि संजू जोडीनं पहिल्या विकेटसाठी 41 रनची पार्टनरशिप करत टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. तिलक वर्मानं नाबाद 19 रन काढले. कॅप्टन सूर्यकुमार यादवं निराशा केली. त्याला खातंही उघडता आलं नाही. तर हार्दिक पांड्या 3 रन काढून नाबाद राहिला. 

टीम इंडियाचा भेदक मारा

त्यापूर्वी टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग घेण्याचा कॅप्टन सूर्यकुमार यादवचा निर्णय भारतीय बॉलर्सनी योग्य ठरवला. अर्शदीप सिंगनं पहिल्याच ओव्हरमध्ये यजमानांना यश मिळवून दिलं. त्यानंतर भारतीय बॉलर्सनी ठराविक अंतरानं विकेट्स घेतल्या. त्यामुळे इंग्लंडची पहिली इनिंग 132 रन्सवरच संपुष्टात आली. 

( नक्की वाचा : IND vs ENG 1stT20I : टीम इंडियाच्या Playing XI मध्ये मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? )

टीम इंडियाकडून वरुण चक्रवर्तीनं सर्वात जास्त 3 विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेलनं यांना प्रत्येकी 2 विकेट्स मिळाल्या. इंग्लंडकडून कॅप्टन जोस बटलरनं एकाकी लढत देत 68 रन्स केले. हॅरी ब्रुकनं 17 तर जोफ्रा आर्चरनं 12 रन काढले. इंग्लंडच्या उर्वरित 8 बॅटर्सना दोन अंकी स्कोअर करता आला नाही.

या विजयासह टीम इंडियानं 5 मॅचच्या टी20 सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सीरिजमधील पुढील सामना 25 जानेवारी रोजी चेन्नईत खेळला जाणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com