IND vs ENG, th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना केनिंग्टन ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. अखेरच्या दिवसाचा खेळ रंगतदार बनला आहे. कारण टीम इंडियाला जिंकण्यासाठी 4 विकेट तर इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची गरज आहे. त्याआधी सामन्यात टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने दुसऱ्या डावात 53 धावा काढून संघाला महत्त्वपूर्ण योगदान दिले. जडेजा फलंदाजी करत असतानाच मैदानावर एक मजेशीरघटना घडली, ज्यामुळे चाहते आणि खेळाडू दोघेही काही काळ आश्चर्यचकित झाले.
टी-शर्टमुळे फलंदाजीमध्ये अडथळा
जडेजा फलंदाजी करत असताना एका चाहत्याने घातलेल्या टी-शर्टमुळे त्याला एकाग्रतेत अडथळा येत होता. स्टेडिअममधील साईड स्क्रीनच्या अगदी जवळ बसलेल्या प्रेक्षकाने लाल रंगाचा टी-शर्ट घातला होता. त्यामुळे जडेजाला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करणे कठीण जात होते. यावर जडेजाने लगेच मैदानावरील अंपायरकडे तक्रार केली. त्यानंतर अंपायरने ग्राऊंड स्टाफला बोलावून या समस्येवर तोडगा काढण्यास सांगितले.
(नक्की वाचा- Jasprit Bumrah : आशिया कपपूर्वी टीम इंडियाला धक्का! जसप्रीत बुमराह आऊट, कारण काय?)
ग्राऊंड स्टाफने त्या चाहत्याला आधी आपली जागा बदलण्याची विनंती केली, पण त्याने नकार दिला. त्यानंतर स्टाफने त्याला ग्रे रंगाचा टी-शर्ट दिला आणि तो घालण्यास सांगितले. त्या प्रेक्षकाने देखील विनंती मान्य करत तो टी-शर्ट घातला. जडेजाने देखील हात उंचावर प्रेक्षकाचे आभार मानले. त्यानंतर सामना पुन्हा सुरू करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे आणि क्रिकेट चाहत्यांमध्ये त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
(नक्की वाचा- IND Vs ENG: ओव्हल टेस्टमध्ये राडा! के एल राहुल थेट पंचांना नडला; पाहा VIDEO)
रवींद्र जडेजाची शानदार कामगिरी
रवींद्र जडेजासाठी ही मालिका खूपच चांगली ठरली आहे. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या मालिकेत त्याने 5 कसोटी सामन्यांच्या 10 डावांमध्ये 86 च्या सरासरीने 516 धावा केल्या, ज्यात 1 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये जडेजा तिसऱ्या क्रमांकावर आहे.