जाहिरात

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियात बदल! दिग्गज खेळाडू होणार बाहेर?

Team India 1st test Playing 11 vs NZ: भारत-न्यूझीलंड सीरिजकडं आगामी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची तयारी म्हणून पाहिलं जात आहे. टीम इंडियाच्या या तयारीला धक्का बसण्याची शक्यता आहे.

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियात बदल! दिग्गज खेळाडू होणार बाहेर?
मुंबई:

Team India 1st test Playing 11 vs NZ:  भारतीय क्रिकेट टीमच्या पुढच्या पिढीचे स्टार यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांच्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध होणारी तीन टेस्ट मॅचची सीरिज महत्त्वाची आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. गिल आणि जैस्वालवर त्यांची परंपरा पुढं नेण्याची जबाबदारी आहे. गिलनं गेल्या दहा इनिंगमध्ये तीन सेंच्युरी आणि दोन हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. तर जैस्वालनं मागील आठ इनिंगमध्ये एक डबल सेंच्युरी आणि पाच हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धही ही लय कायम ठेवून आगामी काळातील कठीण आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांना तयार व्हावं लागणार आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

भारत-न्यूझीलंड सीरिजकडं आगामी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची तयारी म्हणून पाहिलं जात आहे. टीम इंडियाच्या या तयारीला धक्का बसण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा बॅटर शुभमन गिलचा खांदा आणि मान दुखावलीय. त्यामुळे त्याचा पहिल्या टेस्टमधील सहभाग अनिश्चित आहे. गिलनं त्याच्या दुखण्याची माहिती टीम मॅनेजमेंटला दिली आहे. त्याला खेळवण्याबाबतचा निर्णय बुधवारी सकाळी घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

चेतेश्वर पुजाराला वगळल्यानंतर शुबमन गिल टेस्ट टीममधील महत्त्वाच्या तिसऱ्या क्रमांकावर बॅटींग करतोय. नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सीरिजमधील पहिल्या टेस्टमध्ये त्यानं नाबाद 119 रनची खेळी केली होती. 

IND vs AUS:  रोहित शर्मा नसेल कर कोण होणार टीम इंडियाचा कॅप्टन? इथं वाचा उत्तर

( नक्की वाचा :  IND vs AUS: रोहित शर्मा नसेल कर कोण होणार टीम इंडियाचा कॅप्टन? इथं वाचा उत्तर )

कुणाचा होणार समावेश?

शुबमन गिल उपलब्ध नसेल तर तीन नंबरवर खेळवण्यासाठी योग्य पर्याय टीम इंडियाकडं नाही. त्या परिस्थितीमध्ये केएल राहुलला ( KL Rahul) बॅटिंग ऑर्डरमध्ये प्रमोशन दिले जाऊ शकते. मुंबईकर सर्फराज खान आणि विकेट किपर-बॅटर ध्रुव जुरेल हे दोन पर्याय मिडल ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अक्षर पटेल हा आणखी एक ऑलराऊंडर खेळवण्याचा पर्यायही टीम मॅनेजमेंटकडं आहे.

पावसाचं सावट
बंगळुरतील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या टेस्टवर पावसाचं सावट आहे. पाचही दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. बुधवारी सकाळी परिस्थितीचा अंदाज घेऊनच अंतिम टीम जाहीर केली जाईल, असं टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं मॅचच्या आदल्या दिवशी पत्रकारांशी बोलताना जाहीर केलं.  

टीम इंडिया बांगलादेशविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये तीन फास्ट बॉलर आणि दोन स्पिनर्ससह मैदानात उतरली होती. आता न्यूझीलंडविरुद्ध कोणत्या कॉम्बिनेशनसह उतरणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Irani Cup : गावस्कर ते तेंडुलकरपर्यंत कुणालाही जमलं नाही ते सर्फराजनं केलं, Video

( नक्की वाचा :  Irani Cup : गावस्कर ते तेंडुलकरपर्यंत कुणालाही जमलं नाही ते सर्फराजनं केलं, Video )

टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (व्हाईस कॅप्टन), विराट कोहली, शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.

न्यूझीलंड : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल,  मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल ओ'रूर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, टीम साऊदी, केन विल्यमसन, विल यंग मायकेल ब्रेसवेल (फक्त पहिली टेस्ट), इश सोधी (दुसरी आणि तिसरी टेस्ट)
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com